
कोल्हापूर : विमानसेवा सुरू करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच रिजनल कनेक्टीव्हीटी सर्व्हिसमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आणि उडान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्यात कोल्हापूर मुंबई अशी विमान सेवा सुरू झाली. आता उडान फेज टू अंतर्गत, १ नोहेंबर पासून रोज कोल्हापूरहून हैद्राबाद आणि बेंगलोरसाठी विमान उड्डान घेणार आहेत. त्यातून हैद्राबाद- कोल्हापूर आणि बेंगलेार -कोल्हापूर अशी दैनंदिन विमान सेवा सुरू होणार आहे. त्यामुळं पर्यटन आणि औदयोगीक विकासाला चालना मिळेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. २० डिसेंबर पासून इंडीगो एअर लाईनची कोल्हापूर-तिरूपती अशी सेवा सुरू होणार आहे. तसेच उडानच्या फेज थ्री मधून कोल्हापूर ते गोवा आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर विमानतळाचा विकास करून इथली नागरी हवाई सेवा सुरू करण्यासाठी, खासदार पदाची सुत्रे स्विकारल्यापासून धनंजय महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले. विमानतळ विकासासाठी २७४ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करून आणला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून राज्यशासनाचे पाठबळ मिळवले. त्यामुळेच कोल्हापूरच्या विमानतळावर विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत. शिवाय रिजनल कनेक्टीव्हीटी सर्व्हीसमध्ये कोल्हापूरचा समावेश झाल्यामुळे, उडान योजनेअंतर्गत कोल्हापूरची हवाई सेवा सुरू होऊ शकली. सहा महिन्यापुर्वी कोल्हापूर मुंबई अशी सेवा सुरू झाली. ती विस्कळीत झाल्याने एअर डेक्कनला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी आज सांगितले. दरम्यान उडान फेज टू अंतर्गत १ नोहेंबर पासून कोल्हापूर हैद्राबाद आणि कोल्हापूर बेंगलोर या मार्गावर हवाई सेवा सुरू होत आहे. एअर इंडीयाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरच्या माध्यमातून ही सेवा सुरू होणार आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. एटीआर हे ७२ सिटर विमान कोल्हापूरहून दोन्ही शहरासाठी उड्डाण घेणार आहे. त्याचबरोबर हैद्राबादहून कोल्हापूर आणि बेंगलोर कोल्हापूर अशी सेवा दररोज मिळणार आहे.
या सेवेसाठी ऑनलाईन बुकींग प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यात्रा डॉट कॉम, मेक माय ट्रीप आणि एअर इंडीया डॉट इन या वेब पोर्टलवर बुकिंग करता येणार आहे. दोन्ही महत्वाच्या मेट्रो शहरांना कोल्हापूरहून थेट एअर कनेक्टीव्हीटी मिळाल्याने, शहराचा औदयोगीक आणि पर्यटन विकास होईल. तसेच २० डिसेंबर पासून इंडीगो एअर लाईनच्या माध्यमातून,दररोज कोल्हापूर तिरूपती ही सेवा सुरू होणार असल्याने भाविकांची सोय होणार आहे. अलायन्स एअर आणि इंडिगो एअर लाईन्स या दोन्हीही मोठया आणि नामांकित हवाई सेवा देणार्या कंपन्या आहेत. त्यामुळे ही सेवा अखंडीत विना अडथळा सुरू राहील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
लवकरच उडान फेज थ्री साठी हवाई मार्ग निश्चीती होणार आहे. त्यामध्ये एअर डेक्कनचा करार रद्द करून, कोल्हापूर मुंबई विमान सेवा नव्या एअरलाईन्सकडं देण्यासाठी, विमानतळ प्राधिकरण गांभिर्याने विचार करीत आहे. तसेच कोल्हापूरहून अहमदाबाद आणि गोव्यासाठी हवाई सेवा सुरू करण्याला प्राधिकरण अनकुल असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.उडानच्या फेज टू आणि फेज थ्री मुळं कोल्हापूर शहर देशाच्या हवाई नकाशावर ठळक होईल आणि त्यातून जिल्हयाचा सर्वांगीण विकास होईल, असं त्यांनी नमुद केलं. त्यामुळं आणखी एक वचनपुर्ती केल्याचे समाधान आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समिर शेठ उपस्थित होते.
Leave a Reply