
कोल्हापूर : क्रोमा या टाटा समूहातील ऑम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलरने ऐतिहासिक कोल्हापूर शहरामधील आपल्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन आज केले. मसालेदार मिसळ आणि चामडी चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात जुन्या पुणे-बेंगळुरू मार्गावर स्टार हायपरच्या शेजारी १०,००० हून अधिक चौरस फुटांच्या नवीन प्रशस्त जागेत क्रोमाचा शुभारंभ झाला आहे. हे देशातील ११५ वे क्रोमा स्टोअर असेल आणि ६००० हून अधिक अनोख्या उत्पादनांसह ग्राहकांना खुश करेल!
आज देश डिजिटल सुधारणावादाच्या लाटेतून जात असताना प्रत्येक ग्राहकाला नवीनतम व सर्वोत्तम उपकरण उपलब्ध होईल आणि ते त्याला सुलभतेने वापरता येईल हे निश्चित करण्यासाठी क्रोमा आहे. कोल्हापूरच्या ग्राहकांसाठी अधिक उज्ज्वल अशा भविष्याची सुरुवात आज होत आहे, कारण, क्रोमाचे या शहरातील पहिल्या स्टोअर सुरू होत आहे.आपल्या हेतूशी प्रामाणिक राहत, क्रोमा इच्छित इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निवडक रेंज सादर करून, नवीन तंत्रज्ञानाने आयुष्य बदलून टाकण्याच्या शक्यता सर्वांसमोर आणून आणि हे सर्व आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे करून महत्त्वाकांक्षी जीवन शैलीकडील प्रवास वेगवान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
कोल्हापुरातील २००० हून अधिक ग्राहक आपली इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गरज भागवण्यासाठी शेकडो मैलांचे अंतर कापून क्रोमापर्यंत येत होते.या स्टोअर मुळे अशा अनेक ग्राहकांचे आयुष्य अधिक सोपे आणि चांगले होईल, अशी आशा क्रोमाला वाटते.
या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अविजित मित्रा म्हणाले, कोल्हापूर हे एक वेगाने वाढणारे शहर आहे, तथापि आजपर्यंत काही कारणांनी आम्ही या शहरात दाखल झालो नव्हतो. आता स्टार बाजार या आणखी एका टाटासमुहातील व्यवसायाच्या बरोबरीने दाखल होण्यात आम्हाला आनंद वाटत आहे. टाटा समुहाकडे अनुभव आणि विश्वासार्हता आहे. हजारो अत्याधुनिक व एकमेवाद्वितीय गॅजेट्सचा प्रत्यक्ष डेमो ग्राहकांना दाखविण्यापुरताच आमचा कारभार मर्यादीत राहणार नसून आम्ही ग्राहकांना संपूर्ण हयात भर सेवा देण्याचे वचन देत आहोत. गॅजेटच्या जीवनचक्राच्या कालावधीत ही सेवा आम्ही देऊच, त्याशिवाय त्याचे आयुष्य संपल्यानंतरही त्याची विल्हेवाट पर्यावरणदृष्ट्या योग्य अशा पध्दतीने लावण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ. त्याच प्रमाणे आम्ही ग्राहकांना परवडण्या जोग्या योजना उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्यांना सर्वोत्तम अशी गॅजेट्स घेऊन आपली इच्छापूर्ती करता येईल व आनंद उपभोगता येईल.
सणासुदीचे दिवस सुरू असल्याने स्टोअर च्या उद्घाटनासाठी या हून अधिक चांगली वेळ मिळाली नसती. यानिमित्त ग्राहकांपुढे आकर्षक ऑफर्स ची मालिका ठेवण्यात आली आहे. यात एलईडीटीव्ही च्या खरेदी वर दोन ईएमआय मोफत, २०,००० रुपयांपर्यंतचे एक्स्चेंज लाभ, लॅपटॉप खरेदीवर २२,५०० रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू,आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय,अॅक्सिस यांसारख्या अग्रगण्य बँकांच्या क्रेडिट व डेबिटकार्डांवरून केलेल्या खरेदीसाठी आकर्षक कॅशबॅक आहे.
ग्राहकांसाठी आयुष्यभर लागणाऱ्या सेवा पुरवल्याजातील.खरेदीनंतर उत्पादनासाठी सेवा मिळवण्यामध्ये आता ग्राहकांना अडचणी येणार नाहीत. केवळ स्टोअरशी संपर्क साधून ग्राहकाच्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी आवश्यकती सर्व धावाधाव आणि पाठपुरावा क्रोमा करेल. क्रोमा ग्राहकांना त्यांच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक सामानापासून मुक्ती मिळवण्याचा एक सोपा मार्गही उपलब्ध करून देत आहे. ग्राहकांनी ७२०७६६६००० या क्रमांकावर केवळ एक कॉल करून विनंती केल्यानंतर ई-कचरा घेऊन जाण्यासाठी कर्मचारी त्यांच्या घरी येईल आणि या बद्दल प्रशंसेची पावती म्हणून क्रोमा त्यांच्या नावाने एकझाड लावेल.
कोल्हापूर मधील स्टोअरमुळे इन्फिनिटी रिटेल्स चा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र राज्यात अधिक विस्तार झाला आहे. क्रोमाचे हे महाराष्ट्रातील ३८ वेस्टोअर आहे. पत्रकार परिषदेला कोल्हापूर चे व्यवस्थापक संजीव कुमार जांगडे उपस्थित होते.
Leave a Reply