
कोल्हापूर: शुद्ध अश्विन म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सव निमित्ताने साडे तीन शक्ती पीठा पैकी एक असणाऱ्या श्री महालक्ष्मी म्हणजे श्री अंबाबाई मंदिरात श्री महालक्ष्मी भक्त मंडळा च्या वतीने दरवर्षी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी या प्रसादाचा लाभ 25 हजार हुन अधिक भाविकांनी घेतला. 1954 साली महाप्रसादाची परंपरा सुरू झाली. यंदा चे हे 65 वे वर्ष आहे. शिस्तबद्ध पद्धतीने नेटक्या नियोजनामुळे भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी,देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,संगीता खाडे, शिवाजी जाधव,धनाजी जाधव उपस्थित होते.
Leave a Reply