
कोल्हापूर: कोल्हापूर हे तीर्थ क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी भक्त निवासाची उभारणी करण्यात येणार आहे तसेच सध्या दोन बॅटरी कार भाविकांना कोल्हापूर मध्ये फिरण्यासाठी उपलब्ध करण्याचा विचार आहे असे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. शुद्ध अश्विन पोर्णिमेनिमित्त मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply