दिवाळीनिमित्त हाइकवर नवीन  १०० हून अधिक स्टिकर्ससह पारंपरिक भेटकार्डे 

 

हाइक या भारतातील पहिल्या स्वदेशी मॅसेजिंग अॅपने धनत्रयोदशी, दिवाळी व भाऊबीजेसाठी नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक्स सादर केले आहेत.
या नवीन स्टिकर पॅक्समध्ये उत्सवाचे विविध पैलू आणि संबंधित साजरीकरणांचा समावेश आहे. तुम्ही दिवे व फटाके, चमकरणारे दिवे, पारंपरिक रांगोळ्या, मिठाईसह चॅट करू शकता. या सर्वांमधून तुम्ही एकत्र मौजमजा व आनंद घेऊ शकता. उत्साहामध्ये अधिक भर करत तुम्ही तुमचे मित्र व कुटुंबाला आकर्षक व मजेशीर स्टिकर्ससह शुभेच्छा द्या.
हे पॅक इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती व भोजपुरी अशा सहा भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
उत्सवादरम्यान ५ नोव्हेंबरपासून हाइक युजर्स अॅपवर उपलब्ध असलेले स्टिकर्स PlayStore व AppStore येथून डाऊनलोड करू शकतात.

सामाजिक अभिव्यक्तीच्या रुपात स्टिकर्स
स्टिकर्स ही Hike वरील सर्वाधिक लोकप्रिय सुविधा आहे. हाइकद्वारे ४० हून अधिक भाषांमध्ये २०,००० हून अधिक स्टिकर्सची एक लायब्ररी सादर करण्यात येते. ५०० हून अधिक स्टिकर्स पॅक्समध्ये ब-याच प्रकारांना सामील करण्यात आले आहे. यात भारताची रंगबेरंगी सांस्कृतिक पार्श्वभूमी, बॉलिवूड, कॉमेडी, सण, क्रिकेट, कबड्डी आणि स्थानिक प्रसिद्ध वाक्प्रचार, विविध भावना आहेतच. शिवाय, भारतीय सतत जी वेगवेगळी कारणे देत असतात ती कारणेही यात आहेत. याव्यतिरिक्त, हाइक चॅटवर निफ्टी टेक्स्ट-टू-स्टिकर्स वैशिष्ट्य देखील आहे, जे तुम्ही टाईप केलेल्या मेसेजला एका मजेशीर स्टिकरमध्ये बदलू शकते. हे स्टिकर्स तुमच्या भावना व्यक्त करण्याचे प्रभावी आणि उत्कृष्ट माध्यम आहेत. हाइकचे अत्यंत प्रसिद्ध स्टिकर्स आहेत- प्रेम, हास्य व मौजमजेचे स्टिकर्स. त्यानंतर सणासुदीच्या आणि धार्मिक स्टिकर्सना पसंती दिली जाते. दर दिवशी ३०० दशलक्षहून अधिक स्टिकर्स एक्सचेंज केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!