
मुंबई : जग्वार लँड रोव्हर इंडियाने त्यांच्या स्थानिक पातळीवर निर्मित करण्यात आलेल्या पेट्रोल प्रकारातील एफ-पेस या जग्वारच्या पहिल्या परफॉर्मन्स एसयूव्हीच्या उपलब्धतेची घोषणा केली. प्रेस्टिज प्रकारातील २.० ली ४-सिलेंडर, १८४ केडब्ल्यू टर्बोचार्ज्ड इंजेनिअम पेट्रोल इंजिन प्रकारातील, स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेली मॉडेल इअर २०१९ एफ-पेस ही गाडी ६३.१७ लाख (भारतातील एक्स-शोरूम किंमत) या किंमतीला उपलब्ध आहे.
जग्वार लँड रोव्हर इंडिया लि. (जेएलआरआयएल)चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष रोहित सुरी म्हणाले:
“भारतात सादर झाल्यापासूनच्या दोन वर्षांत जग्वार एफ-पेसने जग्वारप्रेमी आणि आमच्या चोखंदळ ग्राहकांच्या कल्पनाशक्तीला आकर्षून घेतले आहे. स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या पेट्रोल प्रकारातील एफ-पेसच्या सादरीकरणासह आमच्या पहिल्या जग्वार एसयूव्हीचे आकर्षण आणखी वाढले आहे.”
चपळता, प्रतिक्रियात्मकता व उत्कृष्टता या जग्वारच्या ख्यातनाम वैशिष्ट्यांसह डिझाइन आणि तयार करण्यात आलेल्या जग्वार एफ-पेसमध्ये अभूतपूर्व दमदारपणा आणि दैनंदिन वापराची सुलभता आहे. २०१९साठी जग्वार एफ-पेसने पार्क असिस्ट, लेन कीप असिस्ट, केबिन एअर आयोनायझेशन, ड्राइव्हर कंडिशन मॉनिटर, ३६० अंशातील पार्किंग सेन्सर, अडॅप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, वाय-फाय हॉटस्पॉट आणि प्रो सर्विसेस तसेच २५.९१ सेमी (१०.२) टच स्क्रीन अशी आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. मॉडेल इअर २०१९ मध्ये प्रकाशमान मेटल ट्रेडप्लेट्स, १०-वे सीट्ससाठी क्रोम स्वीचेस, कृत्रिम लेदरचे हेडलायनर आणि उजळ मेटल पेडल्स अशा अतिरिक्त सुविधाही आहेत.
जग्वार एफ-पेसबद्दलची अधिक माहिती जग्वार इंडियाच्या www.jaguar.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Leave a Reply