
कोल्हापूर : भारतातील आघाडीच्या स्पेशालिटी ऑईल अँड फॅट्स उत्पादक असणाऱ्या एएके कामानी प्रायवेट लिमिटेडने पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये ‘कामानी बेकरी चॅलेंज 2018’स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेस अपेक्षेप्रमाणे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चॅलेंजमध्ये कोल्हापुरामधील आघाडीच्या बेकरीज सहभागी झाल्या होत्या.
यावर्षी स्पर्धेत बालाजी बेकरीने आरोग्य श्रेणीतील विजेतेपद मिळवले. सन बेकरीला दुसऱ्या क्रमांकाचे तर श्री खानाईदेवी बेकरी आणि कन्फेक्शनरीला शेफ्ज चॉईसचा पुरस्कार देण्यात आला. केदारलिंग बेकरीने इनोवेशन श्रेणीमध्ये विजेतेपद मिळवले. या श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस अमोल बेकरीला तर श्री हनुमान सहकारी बेकरीला शेफ्ज चॉईसचा पुरस्कार देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत मत व्यक्त करताना एएके कामानी प्रायवेट लिमिटेडच्या सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष अरुण वर्मा यांनी सांगितले की, “एएके कामानीने देशातील अनेक शहरांमध्ये कामानी बेकरी चॅलेंजचे आयोजन केले होते. कोल्हापूरमध्ये मात्र हा केबीसी स्पर्धात्मक उपक्रम प्रथमच आयोजित केला होता. आम्ही आता केबीसी उपक्रम छोट्या शहरांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर हे शहर बेकरी उत्पादनांसाठी एक अतिशय महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते
केबीसी कोल्हापूरमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या बालाजी बेकरीच्या मदन कारंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “कामानी बेकरी चॅलेंजचे विजेतेपद मिळवल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. एएके कामानी ग्रुपने आम्हाला आमच्यातील कौशल्य प्रदर्शीत करण्यासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. फूड इनोवेशसाठी त्यांच्याकडून मिळत असणाऱ्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आमच्यात सुधारणा करण्यास वाव मिळत आहे. भविष्यात आयोजित केल्या जाणाऱ्या केबीसी चॅलेंजमध्येही आम्ही सहभागी होणार आहोत.”
इनोवेशन श्रेणीत विजेतेपद मिळवणाऱ्या केदारलिंग बेकरीच्या सत्यजीत खाडे यांनी सांगितले की, ”इनोवेशन श्रेणीत पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. भविष्यात आयोजित केल्या जाणाऱ्या केबीसी चॅलेंजमध्येही आम्ही निश्चितपणे सहभागी होणार आहोत. केबीसी उपक्रमामधून खूप काही नवीन शिकता आले आहे. एएके कामानीकडून बेकिंग कम्युनिटीच्या विकासासाठी केल्या जात असणाऱ्या सातत्यपूर्ण उपक्रमांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
Leave a Reply