
कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून “आपुलकीची भिंत’ साकारण्याचा निर्णय घेतला. आणि तेवढ्यावरच न थांबता दसरा चौकात आपुलकीची भिंत हा उपक्रम सुरु केला आहे. दसरा चौकाच्या विस्तीर्ण मैदानात मंडप घालून नवनवीन कपड्यांचे स्टॉल लावले आहेत. हे कपडे घेण्यासाठी लोकांची दसरा चौकात चांगली गर्दी झाली आहे.आज या उपक्रमाला सुरुवात झाली. दहा हजार हुन अधिक गरजू लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. दिवाळी ला गरिब लोकांना नवीन कपडे घेणे परवडत नाही. यासाठीच अश्या प्रकारे उपक्रम राबविण्यात येणार आहे असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
Leave a Reply