
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे खेळासाठी मैदान नसल्याने गुणवत्ता असूनही जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ आदी परिसरातील खेळाडूंचे नुकसान होत होते. या परिसरासह शहरातील खेळाडूंची होणारी परवड लक्षात घेवून या खेळाडूना हक्काचे मैदान उपलब्ध करण्याचा मानस ठेवला होता. त्याची पूर्ती म्हणून पहिल्या टप्प्यात जुना बुधवार पेठ आदी परिसरातील खेळाडूंसाठी मल्टी स्पोर्ट्स टर्फ मैदान उभे करीत असून, आगामी काळात शहरात पाच मल्टी स्पोर्ट्स टर्फ ग्राउन उभारून शहरातील खेळाडूंच्या गुणवत्तेस वाव देवून खेळांना चालना देणार असल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून तोरस्कर चौक येथील शाहू विद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या मल्टी स्पोर्ट्स टर्फ मैदानाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.
तोरस्कर चौक येथील शाहू विद्यालयाच्या प्रांगणात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या रु. ६३ लाखांच्या मल्टी स्पोर्ट्स मैदानाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि माजी महापौर अॅड.महादेवराव आडगुळे यांच्या अध्यक्षते खाली आजी माजी नगरसेवक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी महापौर अॅड.महादेवराव आडगुळे म्हणाले, आमदार राजेश क्षीरसागर यांनी जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शनिवार पेठ आदी परिसरासाठी हा चांगला उपक्रम राबविला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील लोकप्रतिनिधी खेळाडूना हक्काचे मैदान उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. या भागातील खेळाडू बाहेर जाऊन सराव करीत आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. अशा गुणवत्ता धारक खेळाडूना आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या हक्काचे मैदान उपलब्ध करून दिले असून, या संधीचे सोने भागातील खेळाडू करून दाखवतील. आमदार राजेश क्षीरसागर विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व शहरास लाभले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या कल्पनेपलीकडील चांगले प्रकल्प आमदार राजेश क्षीरसागर पूर्ण करीत आहेत. रस्ते, गटारी या विकासाच्या कामापासून तालीम संस्थाना बांधकाम निधी, व्यायाम साहित्य, ठिकठीकाणी ओपन जिम, लहान मुलाना गेम झोन असे अनेक महत्वकांक्षी त्यांनी पूर्ण करून नागरिकांसमोर लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. त्यांच्याच पाठपुराव्यातून पंचगंगा नदी घाटाचे सुशोभीकरणाचे काम काही दिवसात सुरु होईल यासह शासनाकडून रु.५ कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांची गर्दी आपणास पुढील काळात पहावयास मिळेल. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कामाची पोहच पावती त्यांना जनता देणार असून, राजर्षि शाहू महाराजांच्या करवीर नगरीतील ही स्वाभिमानी जनता कतर्व्यदक्ष असणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी ठाम उभी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, या भागातील खेळाडूंसाठी ग्राउंड केल्याचा होत असून, भागातील खेळाडूंचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. या भागासह शहरातील पेठांमधील खेळाडूंची मैदाना अभावी होणारी कुचंबना थांबविण्यासाठी आगामी काळात नाविन्यपूर्ण योजनेतून अशाच पद्धतीची पाच मैदाने उभी करणार आहे. कोल्हापूर ही कले सह क्रीडा नगरी असून, अनेक नामवंत खेळाडू या मातीत घडले आहेत. या खेळाडूंनी देशाची कीर्ती जगभारत पोहचविली असून, त्यांच्या खेळास चालना देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पुढील काळात या खेळाडूंसाठी सातत्याने पाठपुरावा करून खेळास चालना देवू. सामाजिक क्षेत्रात काम करताना आंदोलन, सामजिक उपक्रम, विकास काम या माध्यमातून शहरवासीयांशी जोडलेली नाग अशीच राहणार असून, करवीर नगरीवर येणाऱ्या प्रत्तेक संकटास आणि जनतेच्या प्रश्नास सामोरे जाण्यास आपण अग्रभागी राहू, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
यावेळी बोलताना माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी, सर्वपक्षीय सोहळा आयोजित करून लोकप्रतिनिधीना मान देण्याची कला आमदार राजेश क्षीरसागर यांनी अवगत केली आहे. कोल्हापुरातील प्रत्तेक प्रश्नावर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. या भागातील बऱ्याचशा समस्या त्यांनी दूर केल्या आहे. परतू, गेल्या गणेशोत्सवापासून कोल्हापूरच्या वाटचालीस खिळ घालण्याचे काम काहीच्या कडून सुरु आहे. पैशाचे आमिष दाखवून मानस खरेदी करण्याचे दुर्भाग्य कधी कोल्हापुरात झाले नाही ते काम एका पक्षाकडून चालू आहे. पण, शहरातील स्वाभिमानी जनता कधी पैशाच्या अमिषाला बळी पडली नाही. लोकांना मोहात पडण्याच्या अनेक क्लुप्त्या त्या पक्षाकडून केल्या गेल्या पण त्यात त्यांची पराकाष्टा फेल गेली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी विकास कामासह सामाजिक कामाचा धडाका लावला असून, भागातील नागरिकांनी त्यांच्या कार्यास बळकटी द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांनी जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, सिद्धार्थनगर आदी भागात केलेल्या विकास कामांची यादी वाचून दाखवत रु.६३ लाखांचे मल्टी स्पोर्ट्स मैदान हा भागातील पहिलाच मोठा प्रकल्प आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांचे कामाचे नियोजन नेटके असून, चांगल्या कामासाठी लागणारा निधी तूर्तास देवून काम पूर्ण करून घेण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. आपल्या विकास कामांना पक्षाचे बंधन न ठेवता स्थानिक लोकप्रतिनिधीचां मान राखण्याची कसब त्यांच्यात आहे. त्यामुळे पुढील काळात पक्षाचे कोणतेही बंधन न बाळगता आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे सांगत, शहरातील विकास कामांच्या जोरावर आमदार राजेश क्षीरसागर विजयाची हॅट्रीक साधतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब घाटगे, शिवसेना शाखाप्रमुख सुशील भांदिगरे यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश निपाणीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश केसरकर यांनी केले.
यावेळी जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने वरिष्ठ आठ संघाच्या गटात आणि सोल्जर्स ग्रुप फुटबॉल संघाने के.एस.ए. ब गटात प्रवेश केल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते दोन्ही संघातील खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ. सरिता मोरे, माजी उपमहापौर उदय पवार, माजी नगरसेवक विलास केसरकर, माजी नगरसेवक शशिकांत पाटील, माजी नगरसेवक श्बाळासाहेब पिरजादे, नागेश घोरपडे, अनिल निकम, उदय भोसले, जुना बुधवार तालीम अध्यक्ष नंदकुमार पाटील, शिपुगडे तालीम अध्यक्ष शशिकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते अमर बोडके, शिवसेना उपशहरप्रमुख अनिल पाटील, संतोष दिंडे आदी भागातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply