
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्साह पाहता या जिल्ह्यात युवासेनेची चांगली बांधणी आगामी काळात पहावयास मिळेल. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे, युवासेना अध्यक्ष मा. आदित्याजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा ग्रामीण व शहरी भागात विस्तार करून युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीतून युवकांचे, विध्यार्थ्यांचे व युवकांचे प्रश्न सोडविण्यास सक्षम असणारी युवा सेना ही उत्तम युवा संघटना ठरेल, असा विश्वास आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. युवा सेनेने आज कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुनर्नियुक्ती सह नवीन युवकांना संधी देण्यात आली आहे. युवासेनेमध्ये नियुक्ती झालेल्या सर्वच पदाधिकार्यांचा आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर व पुष्कराज क्षीरसागर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.दि.१७ ऑक्टोबर २०१० साली युवासेनेची स्थापना करण्यात आली आहे. युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना नेते मा. आदित्यजी ठाकरे यांनी युवकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासह सामजिक कार्यातही चांगली भूमिका बजावली आहे. मुंबई मध्ये ओपन जिम ही संकल्पना मा. आदित्यजी ठाकरे यांच्या कल्पनेतून साकारली आहे. यासह मुंबईतील विध्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी टॅबद्वारे शिक्षण आदी संकल्पना युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यानीची मांडली. देशाच्या उन्नतीकरिता युवा वर्गाची आणि विध्यार्थांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे. त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होणे गरजेचे असून, हि गरज ओळखून विध्यार्थी आणि युवा वर्गाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने उचलली आहे. युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर शहरात युवा सेनेच्या वतीने अनेक सामाजिक आणि आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून दरवर्षी विध्यार्थ्याच्या व पालकांच्या होणाऱ्या लुटी विरोधात डोनेशन विरोधी मोर्चा काढला जातो. यासह विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शाळेतील मनमानी कारभार फीवाढ आदी बाबत युवा सेना वेळोवेळी रस्त्यावर उतरत आली आहे. सलग गेली १२ वर्षे विध्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, विध्यार्थ्याना विनाडोनेषण प्रवेश मिळावा यासाठी मोर्चा काढून प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले जात आहे. सलग आठ वर्षे “मैत्री युवा महोत्सव” सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश युवा वर्गास देण्यात येतो. यासह भारतीय संकृतीचे जतन व्हावे, आपली संस्कृती युवा वर्गावर बिंबावी याकरिता दरवर्षी “पारंपारिक दिवस” साजरा करून पारंपारिक वाध्याच्या गजरात युगपुरुषांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात येते. या आंदोलनात्मक कामांसह युवा सेनेच्या वतीने गेल्याच आठवड्यात शहरातील २१ कॉलेजमधील ४२०० विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्याचा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला. यासह वर्षभर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी कार्यक्रम, अंधशाळेतील विद्यार्थ्याना जेवण, वृद्धाश्रमास फळे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. युवासेनेच्या झालेल्या निवडीमध्ये कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाकरिता जिल्हा युवा अधिकारी पदावर मंजीत माने (दक्षिण, उत्तर व करवीर मतदारसंघ), जिल्हा समन्वयक पदावर योगेश चौगुले (दक्षिण, उत्तर व करवीर मतदारसंघ), जिल्हा चिटणीस पदावर अविनाश कामते (दक्षिण, उत्तर व करवीर मतदारसंघ), युवा सेना युवा शहर अधिकारी पदावर पियुष चव्हाण (उत्तर विधानसभा), चेतन शिंदे (उत्तर विधानसभा), विश्वजित साळुंखे (दक्षिण विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी पदावर प्रशांत जगदाळे (कोल्हापूर उत्तर विधानसभा), विधानसभा समन्वयक पदावर शैलेश साळोखे (कोल्हापूर उत्तर विधानसभा), सागर पाटील (कोल्हापूर दक्षिण विधानसभा), आय टी सेल अधिकारी पदावर सौरभ कुलकर्णी व चैतन्य आष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरातील युवासेनेचे काम वाखाणण्याजोगे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासह वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवून युवा सेनेने शहरवासीयांच्या मनात वेगळा ठसा उमठविला आहे. तसेच फुटबॉल, क्रिकेट, लाठी- काठी आदी खेळांची सांगड घालत युवासेना खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. युवासेना मा.आदित्यजी ठाकरे यांचा युवा सेना स्थापन करण्यामागील मूळ उद्देश लक्षात घेवून नवनियुक्त झालेल्या पदाधिकार्यांनी काम करणे गरजेचे आहे. सर्वांना प्रमुख पद मिळावे ही साहजिकच अपेक्षा असते, त्यांचे काम वरिष्ठांपर्यंत पोह्चाविन्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असतो. परंतु हवे असलेले पद मिळाले नाही म्हणून नाराज न होता पक्षनेतृत्वाने दिलेल्या पदाला साजेशे काम करून त्या पदाची शोभा वाढविणे गरजेचे आहे. यातूनच कार्यकर्ता मोठा होत असतो. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे हे युवा सेना पदाधिकार्यांच्या हातात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडनुकींचे बिगुल वाजले असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभेवर भगवा फडकविन्यास सज्ज व्हा, असे आवाहन ही आमदार राजेश क्षीरसागर यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना केले. यावेळी युवानेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, कपिल सरनाईक, ओंकार परमणे, अक्षय कुंभार, शिवतेज सावंत, युवराज भोसले, ओंकार तोडकर आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply