
कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिवशक्ती संगम हा कार्यक्रम येत्या ३ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील मारुंजी या गावी होणार आहे. ४५० एकर परिसरात हा कार्यक्रम होणार असून २००० स्वयंसेवकांचे घोषाचे प्रत्यक्षित होणार आहे. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र प्रांतातून सुमारे १ लाख स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. या रूपाने शक्तीचे दर्शन घडणार आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार असल्याचे शहर संघचालक सूर्यकिरण वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संघाचे स्वयंसेवक हे नेहमी सेवाकार्यात गुंतलेले असतात. संघाच्या विस्तार करण्यासोबत सज्जन शक्तीचे विराट रूप पाहायला मिळावे हा या कार्यक्रमचा मुख्य उद्देश आहे. १ लाख स्वयंसेवकांच्या सह कोल्हापूर जिल्ह्यातून १५ हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला बारकोड देण्यात येणार आहे. मारुंजी या कार्यक्रमाचा ठिकाणी किल्याच्या प्रतिकृती उभारण्यात येणार असून ३५ फुट उंची व २०० फुट रुंद असे व्यासपीठ आहे असे डॉ. वाघ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला कोल्हापूर विभाग संघचालक आपा दड्डीकर, मुकुंद भावे, संदीप कापसे, अनिरुध्द कोल्हापुरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply