
कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक व मल्टीस्पेशालिटी डेंटल सेंटरचे उद्घाटन वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हरीश कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. डेंटल क्लिनिकचे प्रमुख डॉ. अंकुर कुलकर्णी यांनी स्वागत केले. कोल्हापुरातील राजारामपुरी येथे अत्याधुनिक डेंटल क्लिनिक उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या क्लिनिकमध्ये लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार करण्यात येणार आहेत, असे डॉ. अंकुर कुलकर्णी व डॉ. प्रविणा कुलकर्णी यांनी सांगितले. यामध्ये रूट कॅंनाल ट्रीटमेंट फिलिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, दात किडू नयेत यासंबंधी उपाय योजना व माहिती देण्यात येणार आहे. याबरोबरच मोठ्यांच्या दातांवरील इनप्लांट, सिंगल विजिट, रूट कॅनल, कॉस्मेटिक ट्रीटमेंट अशा सुविधा उपलब्ध आहेत. उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी क्लिनिकला भेट दिली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडुरकर, जिल्हा न्यायाधीश बी. डी कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,डॉक्टर्स, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारणा दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी पी.व्ही कुलकर्णी यांनी आभार मानले.
Leave a Reply