
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेल्या करवीरनगरीत विविध क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळी आहेत.परंतु त्यांच्याबद्दल आज आपल्याला पाहिजे तितकी माहिती नाही कारण कोल्हापूरचे ब्रँडिंग झाले नाही.परंतु आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रांत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या लोकांना ब्रँड कोल्हापूर या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करून कोल्हापूरच ब्रँडिंग करण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे असे गौरवोद्गगार भारत सरकारचे परराष्ट्र सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी काढलेत.आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून कोल्हापूरातील कला,क्रीडा,औद्योगिक,शिक्षण अशा विविध क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश समपादन केलेल्या मान्यवरांना ब्रँड कोल्हापूर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
आज हॉटेल सयाजी इथल्या हॉलमध्ये विविध क्षेत्रांत कोल्हापूरच नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणाऱ्या मान्यवरांचा ब्रँड कोल्हापूर या विशेष पुरस्कारानं भारत सरकारचे परराष्ट्र सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.यावेळी डॉ ज्ञानेश्वर मुळे म्हणाले कोल्हापूर हे दातृत्ववाण आहे.या शहराला शाहूंचा ऐतिहासिक वारसा आहे परंतु इथं प्रत्येक क्षेत्रातील दिग्जजांच्या रत्नांची खान आहे.पण आपल्या कोल्हापुरी रत्नाच आपण कधी मार्केटिंग केलं नाही म्हणून आम्ही मागे आहोत.यापुढच्या काळात आपण इथल्या माणसाच टॅलेंट जगभर कसं पोहचेल यासाठी प्रयत्न करा कारण ब्रँडिंग कधीच एका दिवसात होत नसते त्यासाठी सातत्य लागते. ब्रँड कोल्हापूर या पुरस्काराच्या माध्यमातून आता त्याची सुरुवात झालीय आता या कार्यक्रमाच चळवळीत रूपांतर होण्याची गरज आहे तरच कोल्हापुरातील कर्तृत्ववान लोकांची जगाला ओळख होईल आणि कोल्हापुरी ब्रँड जगप्रसिद्ध होईल.कोल्हापुरात टॅलेंट आहे पण त्या टॅलेंटला इथं रोजगार उपलब्ध नाही,इथल्या टॅलेंटला इथंच रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा.कारण मनात आनलं तर या शाहूच्या करवीर नगरीतला माणूस काहीही करू शकतो हा इतिहास आहे.मागे जाऊन पहा सगळ्या लढाया आणि युद्ध ही मराठ्यांनीच केलीत असं सांगत डॉ मुळे यांनी आपल्या भाषणातून उपस्थित करवीरवासीयांच्यात आज पुन्हा नव्याने जोश आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी ध्यानचंद अवॉर्ड विजेते पै दादू चौगले, शरीर सौष्ठव सुहास खामकर,उद्योजक भूषण गांधी, युवा संशोधक अभिनंदन पाटील,प्रियांका पाटील,चिदंबरम शिंदे,शॉर्ट फिल्म निर्माता मेघराज पवार,जलतरणपटू वीरधवल खाडे, साउंड इंजिनिअर उर्मिला सुतार,गिर्यारोहक खुशी काबोज,आयर्न मॅन आकाश कोरगावकर, डॉ प्रदीप पाटील यांचयासह जवळपास 50 विविध क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या मान्यवरांना ब्रँड कोल्हापूर या विशेष पुरस्कारानं डॉ ज्ञानेश्वर मुळे आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.यावेळी www.brandkolhapur.com या वेबसाइटचा उदघाटन शुभारंभ देखील मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.यावेळी पुरस्कार विजेत्या कार रेसिंगमध्ये यश संपादन केलेल्या ध्रुव मोहिते,महिला कुस्तीगीर रेश्मा माने,मेघराज पवार डॉ प्रदीप पाटील यांनी आपल्या मनोगतातून कोल्हापूरच्या कर्तृत्ववान नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सतेज पाटील यानि उपलब्ध केलेलं ब्रँड कोल्हापुरच हे व्यासपीठ नक्कीच प्रेरणादायी आहे असं मत व्यक्त केलं.
सुरुवातीला आमदार सतेज पाटील यांनी आपल्या स्वागतपर भाषणात ब्रँड कोल्हापूर टीमच्या कार्याचा आढावा घेतला.ते म्हणाले भालजी पेंढारकर,संगीतसूर्य केशवराव भोसले,खाशाबा जाधव अरूणा देशपांडे यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कोल्हापूरच्या इतिहासचा पाया रचला आणि त्यांच्याच पावलावर पावले टाकत इथं अनेक क्षेत्रात हिरे, मानके उदयास येता आहेत त्यांना एकत्रित आणून यथोचित गौरव करण्याचा माझा माणस होता आणि म्हणूनच आपण ब्रँड कोल्हापूर ही संकल्पनेच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा आयोजित केलाय .सर्व क्षेत्रातील मान्यवर त्यानिमित्तानं एकत्रित आलेत याचा नकीच नव्या पिढीला फायदा होईल.या कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ञ जे एफ पाटील,सकाळचे निवासी संपादक श्रीरंग गायकवाड,बाळ पाटणकर,डॉ अमर आडके, स्मॅकचे राजू पाटील,वसंतराव मुळीक,दिगदर्शक यशवंत भालकर, अॅड प्रशांत चिटणीस, अॅड विवेक घाटगे,डॉ सुभाष देसाई,संजय शेटे,माणिक मंडलिक, श्रीमती सुनीता सावंत, अॅड फाईनचे अमर पाटील,शिवाजी मोहिते, आषिश कोरगावकर अमोल कोरगावकर,अजय दळवी,अजित कुसाळे, अनंत खासबागदार, विनायक पाचगल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार विनोद काबोज यांनी मानले.
Leave a Reply