कोल्हापूरात १५नोव्हेंबरला सकल मराठा समाजाच्या वैचारिक बैठकीचे आयोजन

 

कोल्हापूर:मराठा समाजास आरक्षण देण्याबद्दल सरकार गंभीर नसून हा निर्णय मागासवर्गीय अहवालावर अवलंबून ठेवण्यात आला आहे.त्यामुळे मागासवर्गीय आयोग अहवालाच्या येणाऱ्या निर्णयाला अनुसरून पुढील भूमिकेबाबत दिशा ठरविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वैचारिक बैठकीचे गुरुवार दिं.१५ नोव्हेंबर रोजी सायं.५वा.मुस्लिम बोर्डींग दसरा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी कोल्हापूर सह जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांनी आपल्या मराठा समाज आरक्षणासाठी बैठकीस उपस्थित राहून आपले विचार मांडावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने विनोद साळोखे, सचिन दामुगडे,अनिकेत पाटील, उमेश पोवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी ते म्हणाले सदर बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्या शासनाच्या निर्णयाला अनुमती अथवा विरोध करण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शासनाची चाललेली चालढकल या विरोधात पुन्हा एकदा सरकारला तत्परतेने निर्णयास भाग पाडणे किंवा मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करणे.तसेच यापूर्वी सरकारने अचानक व चुकीचे निर्णय घेऊन केलेली फसवणूक टाळण्यासाठी समाजाने पूर्व तयारीत असणे गरजेचे आहे. या संदर्भात सकल मराठा समाजाच्या वैचारिक बैठकीचे आयोजन गुरुवार दिं.१५नोव्हेंबर रोजी सायं.५वा.मुस्लिम बोर्डींग दसरा चौक येथे करण्यात आले आहे. तरी संपूर्ण मराठा समाजातील घटकांनी बैठकीस उपस्थित राहून आपले विचार मांडणे व योग्य दिशा ठरविण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले. तसेच शासनाच्या फसवणूक घोषणेच्या निषेधार्थ निषेध फलक ही दसरा चौकात लावण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेला ऋषिकेश पाटील, विजय पाटील, सुहास पोवार,अमोल गायकवाड, अनिकेत सावंत, ओंकार नलवडे,रोहन साळुंखे, आतिष मेवेकर,विक्रम पाटील, संदिप बोरगावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!