१६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार ‘एक सांगायचंय’

 

कोल्हापूर: केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्या अभिनयाची जुगलबंदी लोकेश विजय गुप्तेचे दिग्दर्शकीय पदार्पण असणारा ‘एक सांगायचंय’ हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
मराठी चित्रपटांचा सध्या भरभराटीचा काळ सुरू आहे. नवनवीन आशयविषयांचे चित्रपट तयार होत आहेत. मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करत आहे. या सगळ्या कारणांनी हिंदीतील मातब्बर कलाकार ही मराठी चित्रपटांमध्ये हजेरी लावत आहेत. मराठी चित्रपटांमध्ये दाखल झालेल्या कलाकारांमध्ये आता एक महत्त्वाचं नाव वाढणार आहे.असे दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी सांगितले.आज कोल्हापूरमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.
देवी । सातेरी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या, अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित ‘एक सांगायचंय. UNSAID HARMONY ‘ या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेता के.के. मैनन मराठीत प्रमुख भूमिकेतून पदार्पण करत आहे. अभिनेता लोकेश विजय गुप्तेनं मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांतून स्वतःचा ठसा
उमवटलेला आहे.या सर्व माध्यमातून बरीच वर्ष काम केल्यानंतर आता लोकेश चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला
आहे. पहिल्या चित्रपटासाठी त्यानं नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा निवडली आहे. लोकेश
विजय गुप्तैन या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन संकलनही केले आहे. केके मेनन आणि राजेश्वरी
सचदेव यांच्यासह चित्रपटात पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर,
हर्षिता सोहल, शुभवी गुप्तेविभव राजाध्यक्ष , अभिजित अमकर, सचिन साळवी आदींच्या मुख्य भूमिका आहेत.चित्रपटाचं गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्बनं केलं आहेऑस्कर विजेत्या रेसून पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.तर पुष्पांक गावडेनं सिनेमैटोग्राफी केली
असून चैत्राली लोकेश गुप्तेने वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे.अवधूत गुप्ते, बेला शैडे, तुषार जोशी,
विवेक नाईक, आरती केळकर, राशी हरमळकर यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील गाणी स्वरबद्ध
करण्यात आली आहे.
सिनेमाची कथा मला जेव्हा ऐकवली तेव्हाच ती मला आवडली आणि अवघ्या वीस मिनिटात मी होकार
दिला. महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते.
या सिनेमासाठी मी खास मराठी शिकलो आणि त्यासाठी मला लोकेशची फार मदत झाली असे अभिनेता
के.के.मेनन यांनी सांगितले.
‘हा चित्रपट आहे पालक आणि मुलं ह्यांच्या मधल्या न बोलल्या गेलेल्या सुसंवादाबद्दल…मुलांची आणि
पालकांची बदलत जाणारी मानसिकता, बदलत चाललेली जीवनशैली , पालकांचे व्यस्त शेड्युल्ड यामुळे मुलांकडून असलेल्या अपेक्षा, दिवसागणिक बदलत जाणारं जग, जीवघेणी स्पर्धा, मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुलं या दोघांवरही होणारे बरेवाईट परिणाम या चित्रपटाद्वारे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच वेगळा अनुभव देईल, असं लोकेश गुप्ते यांनी स्पष्ट केले.
के.के मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्या तगड्या अभिनयाची जुगलबंदी असलेलाहा सिनेमा नक्कीच
प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!