
कोल्हापूर : शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी गडकोट किल्ले पाहणे गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मनसोक्त रानावनात किल्ल्यांची भटकंती करण्यासाठी मुभा द्यावी व पालकांनी स्वतः त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आज करवीरचे डी .वाय. एस .पी. श्री सुरज गुरव यांनी युवा सेना आयोजित गड किल्ले स्पर्धा २०१८ या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये केले. कोल्हापूर शहर मधील जवळपास ७२ मंडळांच्या ठिकाणी लहान मुलांनी व मुलींनी एकत्रित येऊन शिवाजी महाराजांचा इतिहास गड किल्ल्यांच्या माध्यमातून समोर आणला आहे या किल्ल्यांची पाहणी करून युवा सेनेच्या माध्यमातून युवासेना विस्तारक हर्षल सुर्वे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या मुलांचा सत्कार केला .शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
गड किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज याचा ईतिहास जपला गेला आहे.हेच किल्ले बनवून कोल्हापूमधील बालचमू नी शिवाजी महाराजांचा ईतिहास समोर आणण्याचा प्रयत्न केला
आहे.या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे अत्यंत गरजेचे होते. आणि गड-कोट-किल्ले संवर्धनाविषयी जाणीव व जागृती निर्माण व्हावी यासाठी युवा सेनेने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाला कोल्हापूर मधील बाल चमू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला शहर संघटक रिया पाटील,यांची उपस्थिती होती.
किल्ले बनविणाऱ्या मुलांचा सत्कार करणे हा कार्यक्रम खूपच कौतुकास्पद असून शिवाजी महाराजांच्या नावाची केवळ घोषणा देणे योग्य नाही तर शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला आणि पहायला शिकणे गरजेचे आहे त्यासाठी मुलांनी कट्ट्यावरच्या गप्पा सोडून गड-कोट-किल्ले पाहणे योग्य होणार आहे तरच आपण शिवाजी ईतिहास समजणार आहे. असे उदगार सुरज गुरव यांनी यावेळी काढले.
महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष असणारे हे गडकोट किल्ले पाहण्याबरोबरच शिवाजी महाराजांवर प्रेम करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मध्ये बदल होणार आहे हा इतिहास म्हणजे आपल्या नसानसात उर्जा निर्माण करणारा करणारा इतिहास आहे मी घडलो शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित पुस्तके वाचल्यामुळे आज प्रत्येक कुटुंबात काहीतरी अडचणी व संकटे असतात त्या अडचणी व संकटांवर आपण या पुस्तकांच्या माध्यमातून वाचन करून मात करू शकतो मीही हेच केले आहे आपणही अशी पुस्तकं वाचा आपणही या मधून घडाल असे सांगून गुरव यांनी राणा वनांची भटकंती करा खूप माहिती मिळेल असे सांगितले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते आज याचा विचार करणे गरजेचे आहे असे सांगून आपण आई-वडिलांसोबत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होणे आवश्यक आहे शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी पुस्तकांमध्ये कमी प्रमाणात आहे तो अधिक वाढविण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे असे सांगितले .गडकोट किल्ले आपण पाहतो पुस्तके वाचतो मात्र त्यांचे संवर्धन होणेही तितकेच गरजेचे आहे असे सांगून पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे त्या मंदिराला नतमस्तक होऊन गडाची पाहणी करावी असे आवाहनही संजय पवार यांनी यावेळी केले.शिवाय पढील वर्षी दीडशेकिल्ले बनविले जातील असेही आवर्जून सांगितले. व मुलांना राजगड किल्ला पाहण्यासाठी न्यावे असेही आव्हान संयोजकांना केले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक ओम दत्त चिले मित्र मंडळ यांनी नरताळा किल्ला बनविला आहे त्यांना पारितोषिक देण्यात आले . दुसरा क्रमांक शिवराय ग्रुप यांनी सुवर्णदुर्ग किल्ला बनविला आहे. तिसरा क्रमांक हडक्या ग्रुप (विजयदुर्ग किल्ला) आणि उत्तेजनार्थ प्रथम हिंदवी ग्रुप (जंजिरा किल्ला) आणि शिवनेरी बालमित्र वारीयर्स (जाणता राजा)याना शिवाजी महाराज यांची मूर्ती व पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये किल्ले बनविण्यात सहभागी झालेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये
नीलेश भोसले युवा मंच (संतोषगड किल्ला ) यंग स्तर चौक (पट्टा किल्ला) शिवराय बॉईज (पन्हाळा किल्ला)नृसिंह तरुण मंडळ (सिंधुदुर्ग किल्ला)
विशेष पुरस्कार मध्ये गजराज मित्र मंडळ (खादेरी उंदेरी किल्ला )शिवतेज मित्र मंडळ तिकोना किल्ला)ओम सोमेश्वर मित्र मंडळ (तोरणा किल्ला) संध्यामठ तरुण मंडळ (सिंहगड किल्ला) विजेता तरुण मंडळ पुरंदर सुभानमंगळ किल्ला ) सम्राट मित्र मंडळ (विजय दुर्ग किल्ला )साठमारी फ्रेंड सर्कल (पन्हाळा पावनखिंड विशाळगड किल्ला) मुक्त सैनिक वसाहत (शिवनेरी किल्ला) राजे ग्रुप प्रतापगड) सदिच्छा तरुण मंडळ ( लोहगड किल्ला ) बनविला आहे.त्यांना पुरस्कार देण्यात आले.तर परीक्षक अमित अडसूळ आणि सूरज ढोले यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हा युवाअधिकारी मंजित माने यांनी प्रास्ताविक करताना कोल्हापूरमध्ये बाळ मावळ्यांनी किल्ले बनविले आहेत ते अभिमानास्पद आहे असे सांगितले तर यावेळी बोलताना युवासेना विस्तारक हर्षल सुर्वे यांनी कोल्हापूरमध्ये बनविलेले किल्ले वाखाणण्याजोगे आहेत.गडकिल्ले यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे हाच उद्देश समोर ठेऊन कार्यक्रम केला आहे .किल्ले पाहण्यास जाऊन जे नाव लिहितात ते आपण पुसावे असे आवाहन केले. यावेळी जय शिवाजी जय भवानी आशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीपूर्वी मुलांचा प्रश्न उत्तरे असाही कार्यक्रम झाला.या कार्यक्रमासाठी चैतन्य अष्टेकर,अभिजित भोसले,सागर पाटील,उमेश कांदेकर युवामंच,जयकुमार पाटील,राजू यादव,जयराम पवार,दिनेश परमार, धनराज कळे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार सागर पाटील यांनी केले.
Leave a Reply