
प्रेक्षकांचा रविवार आणखी स्पेशल करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. रविवार १८ नोव्हेंबरला दुपारी १२ ते ३ आणि रात्री ७ ते १० या वेळेत विठुमाऊली, छत्रीवाली आणि छोटी मालकीण या मालिकांचे महाएपिसोड्स पाहायला मिळतील.मनोरंजनाने परिपूर्ण असे हे महाएपिसोड्स असणार आहेत. महारविवारची सुरुवात होणार आहे‘विठुमाऊली’च्या खास भागाने. पुंडलिकाची मातृवारी हे महाएपिसोडचं वेगळेपण ठरणार आहे. अहंकाराने माजलेल्या पुंडलिकाला त्याने केलेल्या चुकांचा पश्चाताप होतोय. त्यासाठीच त्याने मातृवारी करायचं ठरवलंय. आईच्या शोधासाठी पंढरपुरी निघालेल्या पुंडलिकाच्या वाटेत कली असंख्य अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या अडथळ्यांवर पुंडलिक मात करु शकेल का? पुंडलिकाची मातृवारी पूर्ण होणार का? हे महाएपिसोडमधून उलगडणार आहे. दुपारी १२ ते १ आणि सायंकाळी ७ ते ८ या वेळेत हा खास एपिसोड पहाता येईल.
‘छत्रीवाली’च्या खास भागातून पाहायला मिळेल विक्रम आणि मधुरामधली रोमॅण्टिक केमिस्ट्री. मधुराप्रमाणेच मधुराच्या आईचं मन जिंकण्याचं आव्हान विक्रमपुढे आहे. आजीच्या रुपात लव्हगुरु मिळाल्यामुळे विक्रमचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळेच त्याने कंपनीतले सहकारी, मधुरा तिची आई आणि आजीसोबत एक खास पिकनिक प्लॅन केलीय. याच पिकनिकमध्ये तो मधुरासमोर अनोख्या पद्धतीने प्रेम व्यक्त करणार आहे आणि आईलाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. विक्रम त्याचं ध्येय पूर्ण करु शकेल का? याची उत्सुकता नक्कीच असेल. दुपारी १ ते २ आणि रात्री ८ ते ९ या वेळेत हा खास एपिसोड पहाता येईल.
‘छोटी मालकीण’मध्ये अण्णा श्रीधरला खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न करणार आहेत. श्रीधरची समाजातली वाढती प्रतिष्ठा अण्णांना खटकतेय त्यामुळेच श्रीधरची प्रतिमा डागळण्याचा त्यांचा प्लॅन आहे. श्रीधर विरोधातला अण्णांचा हा डाव यशस्वी होणार का? श्रीधरवरचे आरोप खोटे सिद्ध होणार का?रेवती या सर्व प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावणार? हे ‘छोटी मालकीण’च्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल. रविवार दुपारी २ ते ३ आणि रात्री ९ ते १० यावेळत ‘छोटी मालकीण’ मालिकेतलं हे रणांगण पाहायला मिळेल.तेव्हा मनोरंजनाची ही खास मेजवानी पाहायला विसरु नका रविवार १८ नोव्हेंबरला दुपारी १२ ते ३ आणि रात्री ७ ते १० या वेळेत फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply