
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनास सोमवार दि.१९ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळा, रुग्णालयांकडून नागरिकांची होणारी लुट, सर्किट बेंच, रखडलेले छ. शाहू स्मारक, रखडलेली थेट पाईपलाईन योजना आणि त्यातील गैरकारभार आदी सुमारे ५० तारांकित प्रश्न, ४ लक्षवेधी, अर्धातास सूचना अधिवेशनामध्ये उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधनार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले कि, कोल्हापूर शहरातील टोल, एल.बी.टी., थेट पाईपलाईन, तीर्थक्षेत्र आराखडा सारखे ज्वलंत प्रश्न आपल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत. शहरात आजही अनेक विकास कामे आणि प्रश्न प्रलंबित असून कोल्हापूर शहरातील दैनिक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मेडियातून प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या आधारे शहरातील ज्वलंत प्रश्नावर विविध आयुधांच्या माधाम्यातून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर महत्वाच्या विषयांबाबत संबधित मंत्री महोदायांशी बैठक आयोजित करून समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न असेल.सध्या कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा असलेला विषयांवर या अधिवेशनामध्ये आवाज उठविण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयातून गेल्या तीन महिन्यात तपासणीसाठी अतिरिक्त पैसे घेणे, परवडणारे पॅकेज न देणे, रुग्णाला दोन- चार दिवस जादा अॅडमिट दाखवून जादा पैसे उकळणे, अशा तक्रारी येत होत्या. या तक्रारींबाबात लोकप्रतिनिधींनी पत्रव्यवहार करूनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले होते. यानंतर वैद्यकीय अधिकार्याच्या पथकाने जिल्ह्यातील एकूण ३४ रुग्णालयांवर छापे टाकून तेथील गैरकारभार उघडकीस आणला आहे. अशा दोषीविरुद्ध शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी या अधिवेशनात प्रामुख्याने करणार आहे. यासह कोल्हापूर शहराला ३० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मंजूर झालेल्या मंजूर झालेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामामध्ये झालेला गैरव्यवहारात दोषी असलेल्यांवर कारवाई, यासह मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करण्याबाबतची दाहकता सभागृहासमोर मांडणार आहे.कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळा, कोल्हापूर शहरात रोज होणारा २०० टन कचरा कसबा बावडा येथील झूम प्रकल्पावर असून त्या कच-याच्या ढिगारावरच साठविला जात असल्याबाबत, रेशन धान्य वितरण व्यवस्था आणि दुकानदारांच्या समस्या, जीवनदायी योजनेतील अडचणी, श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था, क्रीडा संकुलाचे अपूर्ण कामकाज, तीर्थक्षेत विकास आराखडा, शहर विकास प्राधिकरणाचे काम आदी तारांकित प्रश्न उपस्थित जाणार आहेत. यासह अर्धातास सूचना, अशासकीय ठराव, औचित्याच्या मुद्याद्वारे शासनास कोल्हापूर जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून, शासनास या प्रश्नाचे गांभीर्य पटवून देणार असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
Leave a Reply