
गडहिंग्लज: ग्रामीण भागातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात खासदार फंडातून निधी उपलब्ध केला आहे. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. गडहिंग्लज तालुक्यातील विविध गावांत खासदार स्थानिक विकास निधीतून मंजूर असलेल्या विकासकामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
गडहिंग्लज तालुक्यातील विविध गावांतील विकास कामांसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या स्थानिक विकास निधीतून लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून करण्यात येणार्या विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. तेरणी या गावात पाच लाख रुपये खर्चून रस्ता करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक, रामराजे कुपेकर, अरुण देसाई, जब्बार मुल्ला यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. हलकर्णीमध्ये पाच लाख रुपये खर्चुन पेव्हिंग ब्लॉक आणि संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. त्याचाही प्रारंभ खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, स्वामी सोमेश्वर शिवाचार्य, जिल्हा परिषद सदस्य रेखा हत्तरकी, जयकुमार मनुळे, सदानंद हत्तरकी, गंगाधर व्हतकुत्ती, त्याचबरोबर इदरगुच्ची या गावात पाच लाख रुपये खर्चून रस्ता करण्यात येणार आहे. त्याचाही शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रामराजे कुपेकर, काशाप्पा गोथोडी, सरपंच जनाबाई रेमजी, विजय मोकाशी यांची विशेष उपस्थिती होती. संसदेत सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करून, ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो, त्यामुळेच दोन वेळा संसदरत्न हा पुरस्कार िमळाल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण खासदारकी पणाला लावली. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग, विमानसेवा हे प्रश्न मार्गी लावले. ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधने निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकास साधल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
Leave a Reply