धार्मिक स्थळांबाबत महापालिकेची भूमिका संशयास्पद: बजरंग दलचा आरोप

 

IMG_20151221_163201कोल्हापूर:- सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांची झालेली बांधकामे निष्कासित करणे,स्थलांतरित करणे किंवा नियमित करणे यासंबंधी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील कोल्हापूरसह सर्व महापालिकांना निर्णय पाठवला आहे.त्यानुसार कोल्हापूर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली.२०११ साली दिलेल्या आदेशाची आता ४ वर्षांनी अमलबजावणी का केली जात आहे,नोटीस देण्यापूर्वी जिल्ह्यातील खासदार आमदार,नगरसेवक किंवा तज्ञ व्यक्तींची मते जाणून का घेतली नाहीत,जे सर्वेक्षण झाले ते चुकीचे झाले,डोळे झाकून सर्वेक्षण केले गेले असा सवाल आज बजरंग दलाच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.कोल्हापूर शहरातील शेकडो धार्मिक स्थळे आहेत.पण खरोखरच जी धार्मिक स्थळे वाहतुकीस अडथळा होत असतील किंवा विनाकारण आहेत ती जरूर हटवावीत पण सर्वेक्षणास नियमावली हवी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.याबाबत हरकती दाखल करणार असल्याचे बजरंग दल जिल्हा प्रमुख संभाजी साळुंखे यांनी सांगितले.त्याचप्रमाणे या संदर्भातील मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आला असल्याचे शहर प्रमुख महेश उरसाल यांनी सांगितले.यावेळी सुधाकर सुतार,राजेंद्र सूर्यवंशी,सुशील भांदिगरे,राज अर्जुनीकर,सागर कलघटगी, किरण पडवळ,सुधीर सूर्यवंशी,शान्नुर गणके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!