
कोल्हापूर :सीपीआर ची झालेली दुरावस्था आणि पुन्हा या जिल्हा रुग्णालायास गत वैभव प्राप्त करुन द्यावे यासाठी सीपीआर बचाओ कृती समितीने सीपीआर समोर धरणे आंदोलन केले. सीपीआर मधील हृदय शास्त्र क्रिया विभाग हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत विभाग होता पण आता तो जवळ जवळ बंद अवस्थेत आहे. 13 व्हेंटिलेटर पैकी 2 ते 3 फक्त चालू अवस्थेत आहेत.सिटी स्कॅन मशिन गेले अडीच वर्षे बंद आहे. सर्व विभागांतील उपकरणांची अवस्थाअत्यंत वाईट आहे. रोज हजारो गरीब रुग्ण आशेने औषध उपचारांसाठी येथे येतात पण त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑक्सीजन नसलेल्या या सीपीआर ला आताच वचविले पाहिजे यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी वसंतराव मुळीक,दिलीप देसाई,अँड.चारुलता चव्हाण,कादरभाई मलबारी,शहाजी कांबळे,बाबा इंदुलकर यांच्यसह कृती समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
Leave a Reply