‘माऊली’ चित्रपटातून रितेश देशमुख सह अजय-अतुल करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण!

 

अनेक हिंदी अभिनेत्यांना रुपेरी पडद्यावर आपल्यासंगीताच्या तालावर नाचायला लावणारी विख्यातसंगीतकार जोडगोळी अजय-अतुल आता ‘माऊली’  या रितेश देशमुख निर्मित आगामी मराठी चित्रपटातझळकताना दिसून येणार आहेत.रितेश देशमुख यांच्या विनंतीचा मान राखून अजय-अतुल या संगीतकार बंधूंनी ‘माझी पंढरीची माय’ यागाण्याद्वारे रुपेरी पडद्याची शोभा आणखीनद्विगुणित केलेली आहे. चित्रपटादरम्यान यागाण्याचे शूटिंग सुरु असतानाच रितेश देशमुखयांनी अजय-अतुल आणि चित्रपटातील प्रमुखअभिनेत्री सैय्यमी खेर यांच्यासह एक खासप्रचारात्मक व्हिडिओ शूट केला आहे.

रितेश देशमुख म्हणतात की, “अजय अतुल यासंगीतकार जोडीस मी या भक्तिपूर्ण गाण्याचे संपूर्णसंक्षिप्त स्वरूप दिले होते आणि त्यानंतर त्यांनीमला त्यांच्या संगीत रचनांनी आश्चर्यचकित करूनसोडले. मी त्यांना दिलेल्या गाण्याच्या संक्षिप्तमाहितीच्या अगदी उलट असं गाणं त्यांनीमाझ्यासमोर प्रस्तुत केलं. खरंतर त्यांच्या संगीतरचनेने आमच्या चित्रपटाच्या पटकथेचा आढावाघेतला व चित्रपटाच्या चांगल्यासाठीच त्यात बदलकेले.”‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरीपडद्यावरील पदार्पणाबद्दल सांगताना अजयगोगावले म्हणतात की, “या व्हिडिओत आम्हीअसावं, ही रितेशची ईच्छा होती.” तर अतुलगोगावले सांगतात की, “रितेशने आम्हाला गाणीतयार करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले. सैराट(२०१६) नंतर आता पुन्हा ‘माऊली’ या मराठीचित्रपटासाठी काम करण्यास आम्हाला खूप आनंदझाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!