बालक पालक’ आणि ‘येल्लो’ सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी प्रथमच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत, तर सुमन साहू यांनी हा चित्रपट चित्रित केला आहे. सोशल मीडियावर नुकत्याच झळकलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या कलरफूल लूकमध्ये सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओमकार गोवर्धन हे अतरंगी कलाकार दिसत आहेत. चित्रपटातील इतर पात्रही लवकरच आपल्या समोर येतील.
चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे कळतंय. त्यामुळे आता हे ‘कल्ला’कार प्रेक्षकांच्या डोक्याला काय शॉट देणार आहेत, हे लवकरच कळेल.

Leave a Reply