अप्सरा आली या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान प्रसिद्ध अभिनेत्री

 

झी युवा या वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षकांची मनोरंजनाची गरज लक्षात घेऊन, झी युवाने प्राईम टाईम देखील वाढवला. या वाहिनीनेप्रेक्षकांसाठी दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रम देखील सादर केले. झी युवा लवकरच ‘अप्सरा आली’ हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. ५ डिसेंबरपासून हा कार्यक्रमप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.नुकतंच या कार्यक्रमाचे प्रोमोज रिलीज झाले आणि प्रेक्षकांचा या प्रोमोजना उदंड प्रतिसाद मिळाला. मराठी सिनेसृष्टीतील एक अदाकारा जिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनय व नृत्य कौशल्याने संपूर्णमहाराष्ट्राला वेड लावलं ती म्हणजे अभिनेत्री दीपाली सय्यद या कार्यक्रमाची परीक्षक असणर आहे.ये गो ये, ये मैना’ या गाण्यातून दिपालीने आपली छाप सोडली, तसेच तिच्या अप्रतिम परफॉर्मन्सनेनेहमीच तिने प्रेक्षकांना मोहून टाकलं आहे. आजवर दिपालीने ३०हून जास्त मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे आणि आता ती अप्सरा आली या कार्यक्रमातून परीक्षकाच्या खुर्चीतविराजमान होणार आहे.अप्सरा आली या कार्यक्रमाबद्दल बोलताना दिली म्हणाली, “डान्स ही माझी आवड आहे, माझा छंद आहे जो मी खूप आवडीने जोपासते. मला लहानपणापासून अभिनेत्री बनायचं होतं आणि त्या दृष्टीने मीपाऊल टाकलं. डान्स हा माझा श्वास आहे आणि मी अप्सरा आली कार्यक्रमात एका पेक्षा एक परफॉर्मन्सेस बघण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!