
उडान फेज टू अंतर्गत, ९ डिसेंबर पासून रोज कोल्हापूरहून हैद्राबाद आणि बेंगलोरसाठी विमान उड्डान घेणार आहेत. त्यातून हैद्राबाद- कोल्हापूर आणि बेंगलेार -कोल्हापूर अशी दैनंदिन विमान सेवा सुरू होणार आहे. ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र हवाई परवाना मिळाला नसल्यामुळं, तांत्रीक कारणामुळे त्याला विलंब झाला. त्यासाठी खासदार महाडिक यांनी दिल्ली इथं जावून नागरी उडान मंत्री सुरेश प्रभू आणि डीजीसीए च्या वरिष्ठ अधिकार्यांशी बैठक घेवून व्हीएफआर हा परवाना मिळावा, अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी हा परवाना देण्यात आला. त्यामुळं एटीआर ही ७२ आसनी विमान कोल्हापुरातून टेकऑफ करण्याचा मार्ग मोकळा झाला. ९ डिसेंबर पासून अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून सुरळीतपणे ही सेवा सुरू राहिल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. त्यामुळं जिल्हयाच्या पर्यटन आणि औद्योगीक विकासाला चालना मिळेल. या हवाई सेवेसाठी ऑनलाईन बुकींग प्रक्रिया आजपासून सुरू झाली. यात्रा डॉट कॉम, मेक माय ट्रीप आणि एअर इंडीया डॉट इन या वेब पोर्टलवर बुकिंग करता येणार आहे. लवकरच कोल्हापूर – तिरूपती या मार्गावर विमानसेवा सुरू होईल. तसेच उडान फेज थ्री साठी हवाई मार्ग निश्चीती होणार आहे. त्यामध्ये एअर डेक्कनचा करार रद्द करून, कोल्हापूर मुंबई विमान सेवा नव्या एअरलाईन्सकडं देण्यासाठी, विमानतळ प्राधिकरण गांभिर्याने विचार करीत आहे. तसेच कोल्हापूरहून अहमदाबाद आणि गोव्यासाठी हवाई सेवा सुरू करण्याला प्राधिकरण अनकुल असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितलं.
Leave a Reply