

श्री चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात डिजिटल क्रांती केली जात आहे. माहिती, तंत्रज्ञानामध्ये राज्याला आणखी सक्षम केले जात आहे. यामध्ये चिनीमंडी सारखे मोबाईल ऍप साखर उद्योगाशी निगडीत असणारी सर्व माहिती शेतकरी, व्यापारी, साखर कारखान्यांसह शेअर बाजाराचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांपर्यंत घेवून जाईल असे चव्हाण म्हणाले.
साखर उद्योगाचे परिपूर्ण आणि अचूक माहिती देणारे भारतातील एकमेव वेबबेस एइन्फर्मेटीव्ह पोर्टल मराठी ,हिंदी ,गुजराती आणि इंग्रजी अशा चार भाषेमध्ये “चीनी मंडी” या नावाने गेल्या मार्च २०१८ पासून कोल्हापूर मध्ये सुरू करण्यात आले आहे .याचे डायरेक्टर हे भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून म्हणजेच कोल्हापूर ,पुणे, मुंबई, आणि दिल्ली येथून कार्यरत आहेत या व्यवसायामध्ये त्यांनी ३० ते ३५ वर्षे काम केले आहे. कोल्हापूर मध्ये या चिनीमंडीचे फाउंडर डायरेक्टर उपल शाह हे आहेत चिनीमंडी च्या फाउंडर डायरेक्टर यांनी आजपासून चिनीमंडी म्हणजे मोबाईल ॲप सुरू केले आहे याचे उद्घाटन आज सकाळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री मा. ना. श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .मा. रवींद्र चव्हाण हे माहिती तंत्रज्ञान मंत्री असल्यामुळे आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला डिजिटल क्रांतीकडे नेण्याचा म्हणजे डिजिटलायझेशनच्या मुख्य हेतू आहे .
साखर उद्योगही आतापर्यंत डिजिटलायझेशन पासून वंचित आहे त्यामुळे चिनिमंडीच्या फाउंडर डायरेकटर्स यांनी पंतप्रधान यांच्या स्वप्निल प्रोजेक्टचा एक भाग हिस्सा हे पोर्टल आहे. चिनीमंडी हे पोर्टल साखर उद्योगाशी संबंधित जवळजवळ १ लाख ७५ हजार पेक्षा जास्त जनांपर्यंत पोहोचले आहे ही एक चिनीमंडीची उत्तुंग भरारी आहे आज उद्घाटन प्रसंगी उपल शाह यांनी राज्यमंत्री माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवींद्र चव्हाण यांना या चिनीमंडी विषयी संपूर्ण माहिती सांगितली.यावेळी चव्हाण यांनी शेतकरी व साखर उद्योग आता डिजीटलायजेशन पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले.
चिनी मंडी मुळे साखर उद्योगात प्रचंड डिजिटल क्रांती केली आहे आणि भारत देशाला डिजिटल इंडिया बनविण्यासाठी पुढाकार घेत आहे. चिनीमंडी मोबाईल ॲप राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या आणि साखर उद्योगाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती प्रत्येकाच्या समोर आणनार आहे शिवाय ती मोबाईलवर दिसणार आहे चिनीमंडी स्थापना करते वेळी केवळ दोन व्यक्ती यामध्ये होत्या आणि आता नऊ महिन्याचा कालावधी या पोर्टलला झाला असून या पोर्टलने उच्च शिखर गाठले आहे सध्या या मोबाईलवर बातम्या, मार्केट बद्दल माहिती, पब्लिक गव्हरमेंट नोटिफिकेशन ,साखरेचे राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय भाव, साखर उद्योगाशी होणारे लोकांच्या मुलाखती, आयडी भारतभरातील टेंडर्स आदींची माहिती मिळणार आहे .
या साखर उद्योगाच्या सर्व बातम्या व माहिती आवाज रूपात ऐकायला मिळणार आहेत हे पोर्टल चीनीमंडी न्यूज या नावाने रजिस्ट्रेशन असून अल्पकाळातच मराठी ,इंग्रजी ,हिंदी व गुजराती भाषेत हे सुरू होणार आहे या वेबसाईटवर साखर उद्योगाशी संबंधित कार्यालय मंत्री महोदय सचिव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील सगळ्यात साखर कारखान्याची माहिती ,फोन नंबर, गाव, तालुका जिल्हा एमडी चे नाव, डायरेक्टर्स राज्य अशी सर्व माहिती मिळणार आहे .
चिनीमंडीची रिसर्च टीम कारखाने व शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांच्या अडचणी व इतर माहिती घेत आहेत .आज झालेल्या कार्यक्रमाला डॉ. खानोळकर ,डॉ.अतुल काळसेकर ,डॉ .अजय पवार ,विजय नावधर, यतिराज मर्दा ,हेमंत शहा, शहाजी दीपेश दिरांनी ,गौतम शहा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपर शाह यांनी मानले
Leave a Reply