
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर अनेक नाट्यमय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. सरिता नंदकुमार मोरे या महापौर विराजमान झाल्या. कोल्हापूर महापालिकेच्या या ४७ व्या महापौर आहेत.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सात नगरसेवक यांचे पद धोक्यात आहे असे सांगितले होते. आज प्रत्यक्षात अश्विनी रामाणे यांचे जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले. याचबरोबर अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे याचे पद याआधीच रद्द करण्यात आले होते. यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.
महापौर पदासाठी भाजप ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी जयश्री जाधव यांना 33 मते आणि सरिता मोरे यांना 41 मते मिळाली.याचप्रमाणे राजकीय बलाबल उपमहापौर निवड प्रक्रियेत राहिले आणि काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४४ व्या उपमहापौर पदी विजयी झाले. महानगरपालिका सभागृहात पंधरा मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला गेला. पण कोणीही माघार घेतली नाही.
या निवडणुक प्रक्रियेत शिवसेनेचे ४ नगरसेवक राहुल चव्हाण, प्रतीज्ञा निल्ले, रियाज खान, अभिजित चव्हाण गैरहजर राहिले.महानगरपालिका महापौर पद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला होता. या नियमानुसार ही निवड झाली.
It is recommended you get a second hand trailers for sale which are relatively fresh.
Be sure to go and visit making a fleet of. Collect brochures and pamphlets from stores that sell bridesmaid dresses. https://918kiss.host/70-mega888
I dugg some of you post as I cerebrated they were very helpful very helpful. https://cryptorevoltreview.com/