कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर यांच्या वतीने कोल्हापूर मध्ये “वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन्स २०१८ ” या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन १५ ते १८ डिसेंबर २०१८ या चार दिवस कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडिस्ट्री अँड अँग्रीकल्चरचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.यावेळो प्रमुख पाहुणे म्हणून खा.धनंजय महाडिक,नूतन महापौर सौ.सरिता मोरे,सारस्वत को -ऑप बँकेचे गौतम ठाकूर,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरचे संतोष मंडलेचा आदी उपस्थित राहणार आहेत.तर १७ रोजी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांची उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर वेसमॅक,कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर तसेच कोल्हापूर मधील विविध औद्योगिक संघटना यांनी या प्रदर्शनाचे नियोजन केले आहे .तर सारस्वत बँक या प्रदर्शनाचे प्रायोजक असून उद्योग सोसायटी , स्मॅक ,गोशिमा,कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, फाईव्ह स्टार एमआयडीसी, फाऊड्रीमन असोसिएशन यांनी या प्रदर्शनाला विशेष सहकार्य केले आहे. या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटिव्ह एक्झिबीशन अँड इव्हेंट या संस्थेने केले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये १०० स्टॉल्सचा समावेश आहे.शासकीय उद्योग धंदे याच्याशी निगडित स्टॉल आहेत.शिवाय शासकीय उद्योगधंदे यांच्याशी निगडीत योजनाची माहितीही मिळणार आहे.
उद्योग क्षेत्राशी निगडित असलेल्या या प्रदर्शनामध्ये राज्यातील कोल्हापूरसह देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे . महाराष्ट्रातील सर्वच उद्योजकांना व त्यांच्या विविध उद्योगांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून फायदा होणार आहे.
या प्रदर्शनात समावेश असणाऱ्या कंपन्यांमध्ये गोदरेज,किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड ,एस्सार, गुडवेल इंजिनिअरिंग, टाटा ग्रुप,बॉश, मायक्रोटेक, रिलायन्स ,टेक्नोमेट एंटरप्राइजेस ,गुडेल आय एन सी, संकल्प इंडस्ट्रीज, दर्शना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, प्रोफेशनल सपोर्ट , इंटोविस्टा ऑटोमेशन. ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि, मायक्रो लॉग सिस्टिम प्रा. लि. डेल्टा ग्रुप,अत्तार स्टील स्ट्रक्चर प्रा. लि, बालाजी सेल्स कार्पोरेशन , कोटीभास्कर मटेरियल हँडलिंग इकविपमेंट, सद्गुरु इंजिनियर्स, सिल्वर लाईन इलेक्ट्रिकस,वार्प इंजिनियर्स आदी कंपन्यांचा समावेश आहे.
कोल्हापूरमध्ये होणारे हे पाचवे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये पॅकेजिंग, सोलर ,वेविंग मशीन, स्टोअरेंज सिस्टीम, कटिंग ,मशीन टूल्स, हायड्रोलिक क्रेनस,बेअरिंग ,नटबोल्ट मटेरियल हँडलींग, सीसी सिस्टीम आदी विविध उत्पादने पाहावयास मिळणार आहेत
कोल्हापूर जिल्ह्यासह विविध ठिकाणच्या उद्योजकांना उद्योग धंद्याची माहिती हवी असल्यास त्यासाठी दिल्लीला जावे लागते ही माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल अँड अँग्रीकल्चर यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.कोल्हापूर जिल्हयातील व संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांना महत्त्वपूर्ण असणारे हे प्रदर्शन उद्योजकांना नाविन्यपूर्ण माहिती देणारे असणार आहेत .विविध उद्योजकांची चर्चा सत्र होणार आहेत .तरी या प्रदर्शनाचा लाभ महाराष्ट्रातील उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने ललित गांधी यांनी केले आहे.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमाचे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल,उद्यम को.ऑप. सोसायटीच्या अध्यक्षा संगीता नलवडे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, फौंड्रीमन असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश चौगुले,व फाईव्ह स्टार एमआयडीसिचे अध्यक्ष हरिशचंद्र धोत्रे आदी उपस्थित होते.आज या प्रदर्शनाचा मंडप शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply