कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 2 शिवाजी मार्केट अंतर्गत आज 21 विनापरवाना डिजीटल फलक हटविण्यात आले.शहरामध्ये विनापरवाना जाहिरात, शुभेच्छा फलक उभे करण्यात आलेली आहेत. जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी परवानगी घेतलेली नाही अशा अवैध जाहिरात फलक, होर्डिग्ज, बॅनर्स हटविणेची कारवाई महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत आज शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत छ.शिवाजी चौक, गंगावेश, रंकाळा स्टॅड, बिनखांबी गणेश मंदीर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, महाराणा प्रताप चौक, लक्ष्मीपुरी व महानगरपालिका चौक या परिसरातील विनापरवाना 21 डिजीटल बोर्ड हटविण्यात आले. तरी विनापरवाना लावणेत आलेले जाहिरात फलक, शुभेच्छा बोर्ड, फ्लेक्स त्वरीत संबधीतांनी काढून घ्यावेत असे महानगरपालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply