
कोल्हापूर :उच्च न्यायालयाने अनाधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे नियमीत करणे, स्थलांतरीत करणे किंवा निष्कासित करणेबाबत कालबध्द कार्यक्रम (Time Bound Programme) निश्चित करुन सादर करणेबाबत दिलेल्या सुचनांचे अनुषंगाने मा.जिल्हाधिकारीसो, कोल्हापूर यांनी त्यांचेकडील क्र.कार्या 7/गृह 1/आरआर/2214/2015 दि.19.11.2015 चे पत्रांन्वये कोल्हापूर जिल्हयाचा सुधारीत कालबध्द कृती कार्यक्रम मा.विभागीय आयुक्त, पूणे विभाग, पुणे यांचेकडे सादर केलेला आहे. आणि या सुधारीत कालबध्द कार्यक्रमानुसार ज्या अनाधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे नियमीत करावयाची आहेत त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित विभागाचे संकेतस्थळावर तसेच प्रसिध्दी माध्यमा व्दारे प्रसिध्द करणे व त्याबाबत दावे हरकती मागविणेच्या कार्यवाहीसाठी दि.24.11.2015 ही अंतीम मुदत निश्चित करणेत आलेली आहे.
दि.21/11/2015 रोजीच्या वृत्तपत्रामध्ये व महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर अनधिकृत धार्मिक स्थळांची यांदी प्रसिध्द करणेत आलेली आहे.
सदर यादीतील धार्मिक स्थळांचे नियमीतीकरण करण्या संबंधाने ज्या कोणास हरकती व सुचना दयावयाच्या असतील त्यांनी त्या सदरची नोटीस प्रसिध्द झालेल्या दिनांका पासुन 1 महिन्याचे आत या कार्यालयाकडे सादर कराव्यात.असे नमुद केले आहे.
अद्याप ज्यांना हरकती/सुचना दाखल करावयाच्या आहेत त्यांनी दि.24/12/2015 रोजी सकाळी 9.45 ते सायं 5.45 वा पर्यत संबधित विभागीय कार्यालयाकडे सादर कराव्यात दि.24/12/2015 रोजी शासकीय सुट्टी दिवशी अर्ज विभागीय कार्यालयामध्ये हरकती/सुचना स्विकारणेची व्यवस्था करणेत आलेली आहे
Leave a Reply