वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन्स या औद्योगिक प्रदर्शनास गर्दी ,चांगला प्रतिसाद

 

कोल्हापूर : शाहूपुरी जिमखाना मैदान येथे गेली दोन दिवस सुरू असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रिकल्चर यांच्या वतीने आयोजित “वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन्स २०१८ ” या औद्योगिक प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे आज प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अजूनही दोन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
आज दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात सारस्वत को-ऑप,बँकेचे स्पीकर जि.एम श्री. प्रवीण तपारिया यांनी मार्गदर्शन करताना उद्योग क्षेत्रातील अर्थसहाय्य या विषयावर सध्या बोलताना बँकांचा एनपीए वाढत चालला आहे मात्र सारस्वत बँकेचा एनपीए कमी आहे हे वाखाणण्याजोगे आहे प्रत्येक योजना बनविताना ग्राहकांकडून माहिती घेऊन बनविली जाते त्यामुळे ६० हजार कोटी उलाढाल आहे ती एक लाख कोटी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी व्यासपीठावर अजित बिरवाडकर,झंवर ग्रुपचे रामप्रताप झंवर , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे जनरल सेक्रेटरी सागर नागरे आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड ,एस्सार, गुडवेल इंजिनिअरिंग, टाटाग्रुप,बॉश,प्रोटॉन,पयोगोदरेज,मायक्रोटेक ,टेक्नोमेट एंटरप्राइजेस ,गुडेल आय एन सी, संकल्प इंडस्ट्रीज, दर्शना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, प्रोफेशनल सपोर्ट , इंटोविस्टा ऑटोमेशन. ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि, मायक्रो लॉग सिस्टिम प्रा. लि., डेल्टा ग्रुप,अत्तार स्टील स्ट्रक्चर प्रा. लि कोटीभास्कर मटेरियल हँडलिंग इकविपमेंट, सिल्वर लाईन इलेक्ट्रिकस,वार्प इंजिनियर्स आदी कंपन्यांची पॅकेजिंग, सोलर ,वेविंग मशीन, स्टोअरेंज सिस्टीम, कटिंग ,मशीन टूल्स, हायड्रोलिक क्रेनस,बेअरिंग ,नटबोल्ट मटेरियल हँडलींग, सीसी सिस्टीम आदी विविध उत्पादने पाहावयास उद्योजकांनी गर्दी केली आहे
उद्या १७ रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांची उपस्थिती असणार आहे.याचबरोबर यावेळी एमआयडीसीचे सीईओ डॉ.अन्बलगन,सारस्वत को-ऑप.बँकेच्या एमडी स्मिता संधाने,झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या श्री रामप्रताप झंवर,एमआयडीसी कोल्हापूरचे रिजनल ऑफिसर विक्रांत चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनात समावेश असणाऱ्या कंपन्यांमध्ये गोदरेज ,किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड ,एस्सार, गुडवेल इंजिनिअरिंग, टाटा ग्रुप,बॉश, मायक्रोटेक ,टेक्नोमेट एंटरप्राइजेस ,गुडेल आय एन सी, संकल्प इंडस्ट्रीज, दर्शना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, प्रोफेशनल सपोर्ट , इंटोविस्टा ऑटोमेशन. ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि, मायक्रो लॉग सिस्टिम प्रा. लि., डेल्टा ग्रुप,अत्तार स्टील स्ट्रक्चर प्रा. लि, बालाजी सेल्स कार्पोरेशन , कोटीभास्कर मटेरियल हँडलिंग इकविपमेंट, सद्गुरु इंजिनियर्स, सिल्वर लाईन इलेक्ट्रिकस,वार्प इंजिनियर्स आदी कंपन्यांचा समावेश आहे.
कोल्हापूर मध्ये होणारे हे प्रदर्शन पाचवे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये पॅकेजिंग, सोलर ,वेविंग मशीन, स्टोअरेंज सिस्टीम, कटिंग ,मशीन टूल्स, हायड्रोलिक क्रेनस,बेअरिंग ,नटबोल्ट मटेरियल हँडलींग, सीसी सिस्टीम आदी विविध उत्पादने पाहावयास मिळणार आहेत
दोन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून या प्रदर्शनाचा लाभ महाराष्ट्रातील उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने श्री. ललित गांधी व क्रिएटिव्हचे सुजित चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!