
कोल्हापूर : उत्तम आरोग्य असेल तरच महिला सक्षम होणार पूर्वीपेक्षा आता महिला सक्षम आहेत असा सूर ‘महाराष्ट्र वेस्टर्न कन्वर्जन्स २०१८ ‘ प्रदर्शनात महिला चर्चासत्रात उमटला.पूर्वीच्या काळी महिला घराबाहेर पडत नव्हत्या आता परिस्थिती तशी राहिली नसून त्यात चूल आणि मूल यातच न राहता आता महिला घराबाहेर पडून आपले ध्येय साध्य करण्यासाठी कष्टाची तयारी करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत सक्षम पणे त्या आपल्या क्षेत्रात वावरत आहेत असा सूरही आज कोल्हापूर मध्ये वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स २०१८ या औद्योगिक विषय प्रदर्शनात आयोजित केलेल्या महिला चर्चासत्रात उमटला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रिकल्चर यांच्या वतीने कोल्हापूर मध्ये “वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन्स २०१८ ” या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आज दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ते १ या वेळेत महिला प्रत्येक निर्मितीची वास्तवशक्ती यावर विषयावर समोरासमोर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सौ.विजया पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक,सौ. प्रतिमा पाटील,सौ. लेखा मिनचेकर, सौ.अश्विनी दाणीगौड यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी आपण कसे घडलो व सध्या काय कार्य करीत आहोत याचे अनुभव सांगितले. यावेळी बोलताना अश्विनी दाणीगौड यांनी मुन्ना कंपनी काय काम करते याविषयी सविस्तर सांगितले कोल्हापूर मध्ये खूप टॅलेंट आहे खूप काही आपण करू शकतो मात्र त्यासाठी निश्चित ध्येय असणे गरजेचे आहे ही कंपनी आरोग्य विषयाची माहिती गुगल द्वारे लोकांपर्यंत पोहोचवीत आहे.३२ डॉ यांची महितीही आहे. त्याचा उपयोग लोकांनी करून घ्यावा असे सांगितले या कंपनीच्या माध्यमातून अनेक विदेशी ठिकाणी जाऊन आमचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना विजया पाटील यांनी आपल्या लहानपणापासून आपण कसे घडलो याविषयी माहिती उपस्थित महिलांना दिली .न्युज पेपर चालवीत असताना पुरुषांच्या बरोबरीने काम करून प्रसंगी आरोप सहन करून कशा पद्धतीने आज आपण उभे आहोत व समाजात सर्वांसमोर कार्य करीत आहोत याविषयीची माहिती दिली .उपस्थित महिलांना निश्चितच ही माहिती प्रेरणादायी अशीच होती एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुन्हा वेगळा आहे परंतु तो दूर करून मी स्वतः कशा पद्धतीने काम केले आणि मोठी झाली या विषयीच्या सर्व बाबींचा उलगडा त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांसमोर आणला शिवाय २४ तास आवजी ३२ तास काम करण्याची तयारी मी ठेवली होती आणि त्या पद्धतीने मी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. खूप काही करण्यासारखे आहे त्यासाठी परंतु त्यासाठी झोकून देऊन काम करण्याची तयारी आणि अंगी बाणवली पाहिजे असे त्यांनी सांगितले मी नास्तिक आहे परंतु चांगले काम करीत असल्याचे सांगितले.शिवाय महिलांनी आपले आरोग्य चांगले ठेवले तरच त्या सर्व गोष्टी साध्य करु शकणार आहेत असे सांगितले.
यावेळी बोलताना सौ प्रतिमा पाटील यांनी मी खूप लहान असताना माझे लग्न झाले पण मी पतीसोबत सध्या काम करीत असून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम जोमाने करीत असल्याचे सांगितले ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये घराबाहेर पडण्याची मानसिकता आजही नाही मात्र गेल्या बारा वर्षात आम्ही हे खोडून काढून महिलांना गृहिणी महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना सक्षम बनविण्याचे काम करीत असल्याचे सांगून शासन स्तरावरील योजना महिलांपर्यंत पोहोचविला आहेत आजही बऱ्याच महिलांना सहकार्य मिळत नाही ते सहकार्य करण्याचे काम आम्ही व्याख्यानाद्वारे केले असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडीक यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी विचारलेल्या आपण राजकारणात खासदारकी लढविणार आहात का या प्रश्नावर बोलताना मी माझ्या कामात समाधानी असल्याचे सांगून आपण जे काही काम करत आहोत त्या कामाचा हा पोहो याठिकाणी केला यामध्ये त्यांनी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन महिलांचे प्रबोधन केले आहे शिवाय महिलांना संघटित करण्याचे कार्य केले असल्याचे सांगितले घरातून बाहेर पडताना खासदार धनंजय महाडिक यांची परवानगी घेते आणि मगच काम करते असे सांगितले प्रत्येक काम करत असताना पतीशी चर्चा करूनच काम करत असल्याचे सांगितले महिलांची मानसिकता तयार करताना खूपच अडचणी आहेत आव्हाने आहेत ती आव्हाने अडचणी दूर करूनच महिलांना आम्हाला तयार करावे लागते असे सांगून मी जीवनात कोणताही संघर्ष केलेला नाही किंवा कोणताही मला राजकीय वारसा नाही मात्र समाजात सकारात्मक विचाराने काम करणे गरजेचे आहे त्या पद्धतीनेच मी काम करीत असल्याचे सांगितले व यापुढेही काम करीत आता ६० ते ७० हजार महिलांना संघटित करून त्यांना घराबाहेर काढून व स्वतःच्या पायावर उभे केले असल्याचे सांगितले
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष
सौ .शौमिका
महाडिक यांनी मी घाटगे घराण्यातील आहे परंतु लग्न झाल्यानंतर माझा राजकारणाशी संबंध आला जिल्हा परिषद सांभाळत असताना पुरुषांच्या मध्ये राहून काम करावे लागते बहुदा महिलांशी संपर्क कमी येतो मात्र आरोपांना सामोरे जाऊन प्रश्न जाणून घेऊन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण उत्तरे द्यावी लागतात असे सांगितले मी राजकारणात येण्यापूर्वी घराणे राजकारणात असल्याने मला जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली आणि जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी मिळाली . मी नास्तिक नाही परंतु घरातून बाहेर पडताना देवाला न विसरता नमस्कार करते. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करताना माझ्यासमोर अनेक आव्हाने आहेत ती पार करत मी सकारात्मकपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले .माझा प्रवास मातृत्व व कर्तुत्व असा राहिला आहे असे सांगून देवानेच माझ्याकडून कर्म हीच पूजा आहे अशी अपेक्षा ठेवली आहे आणि त्यामुळेच आज मी येथे आहे असे सांगितले.सौ लेखा मिनचेकर यांनी शिक्षनाविषयी बोलताना मी ११ ते २ विद्यार्थी याना देते व २ नंतर कुटुंबाला वेळ देते असे सांगून एकही सुटी घेत नाही संपूर्ण वेळ मुलांना देत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी स्त्री उद्योजक यांचा प्रवास खडतर आहे त्यातून उभ्या राहून त्या आपली वाटचाल करीत आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे असे सांगून जिल्हा परिषद अध्यक्ष यांना जिल्हा परिषद शाळा साठी मी काम करू इच्छितो माजी मदत लागल्यास मला अवश्य सांगा असे सांगितले. सध्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मोबाईल कॅन्सर बस सुरू करण्यात आली आहे जी फिरून रुग्णांची तपासणी करीत आहे आतापर्यंत ८५ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये बाराशे लोकांना कॅन्सर असल्याचे सिद्ध झाले आहे त्यावर काम चालू आहे कोल्हापूरमध्ये ही ही बस लवकरच आणली जाणार आहे त्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
या चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.कोल्हापूर जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करून यावेळी चर्चासत्रात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वुमेन इम्पोवेरमेन्ट चेअरपर्सन प्रज्ञा पोंक्षे यांनी कुर्डीनेटर केले.
Leave a Reply