
कोल्हापूर: कोल्हापूरच्या कलानगरीतल कलावंताना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने ३ रा कलामहोत्सव संपन्न होत आहे. यामध्ये चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन आणि विक्री भव्य स्वरूपात होणार आहे अशी माहिती
आयोजक आमदार सतेज डी. पाटील यांनी दिली.
कोल्हापूर आर्ट फौंडेशन या संस्थेचा ३ रा ‘कोल्हापूर कला महोत्सव २०१८’ हा चित्रकार शिल्पकार यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने संपन्न होत असणारा कला महोत्सव दि.२२ ते २६ डिसेंबर दरम्यान दसरा चौक मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कलामहोत्सवात कोल्हापर जिल्ह्यातील चित्रकार-शिल्पकार हस्तकारागिर सहभागी होत आहेत. सोबत मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. तसेच स्थानिक कलाकरांच्या कलाकृतीना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा मुख्य उद्देश देवून कलामहोत्सवाची योजना करण्यात आली आहे.
या कोल्हापूर कला महोत्सवासाठी दसरा चौकातील मैदानावर भव्य आर्ट गॅलरी सदृष्यमंडप उभा केला जाणार आहे. मंडपाच्या प्रवेशव्दाराला कोल्हापूरचे ऐतिहासिक कलात्मक पर्यटन स्थळांचे दर्शन होणारे प्रवेश व्दारा असणार आहे. मंडपात चित्र-शिल्प, हस्तकारांगिरांसाठी स्वतंत्र दालने असतील त्यामध्ये कलावंताना आपल्या कालाकृती प्रदर्शन आणि विक्री करण्याच्या दृष्टीने आर्ट गॅलरी सदृष्य स्टॉल उभे केली जातील. यामध्ये स्थानिक चित्रकार, शिल्पकार, हस्तकागिर आपल्या विविध शैलीतील माध्यमांतील कलाकृती मांडतील. या चित्र शिल्पांच्या विविध कलाकृती बरोबर हस्तकारागिर –कागदकाम, लाकडी खेळणी, देवदेवतांच्या -महापुरुषांच्या मुत्र्या, मातीची भांडी खेळणी पॉटरी, असे स्वतंत्र स्टॉल असतील. त्याच बरोबर कला निर्मितीसाठी लागणारी साहित्य सामुग्री, पुस्तके, कॅसेट, इ.स्वंतत्र कमर्शियल स्टॉल असतील. सोबत कोल्हापूरची खासीयत असणारे कोल्हापूरी खाद्य पदार्थ बचत गटांच्या माध्यमातून असे स्टॉल उभारले जातील. यात विशेष आकर्षण म्हणजे विविध नैसर्गिक साधन संपत्ती प्राणी पक्षी, फुलपाखरे यांच्या छायाचित्रकांचे प्रदर्शन तसेच जुन्या कोल्हापूरातील लोकजीवन, विविध वास्तु, यांचे कृष्णधवल छायाचित्रप्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हा कलामहोत्सव रसिकांना पहायला विनाशुल्क व कलावृत्ती खरेदीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान सकाळच्या सत्रात मान्यवर राज्यातील स्थानिक मान्यवर चित्रकारांची शिल्पकारांची प्रात्यक्षिके सादर होतील. सायंकाळी संगित वादन, गायनाची मैफील सादर होईल त्यामध्ये स्थनिक कलावंत आपली पारंपारिक कला सादर होईल. अशी रंगसुरांची मैफल सलग पाच दिवस कलारसिंकाना अनुभवता येईल. त्याचबरोबर या कलामहोत्सवात बाल चित्रकार स्पर्धां तसेच या कलामहोत्सवातीेल क्षणछायाचित्र स्पर्धां आयोजित केली आहे. कला रसिंकासाठी, संवाद, राज्यातील व राज्याबाहेरील कलातज्ञ भाग घेवून मार्गदर्शन करतील.
या कोल्हापूर कला महोत्सवाचे उद्घाटन २२ डिसेंबर रोजी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या शुभहस्ते होईल. त्याचबरोबर कलाकृती विक्रीच्या दृष्टीने मान्यवर, उद्योजक, डॉक्टर्स, बिल्डर्स, अर्किटेक्चर, प्रतिष्ठीत कलाप्रेमी लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित केले जाणार आहे. हा कलामहोत्सवातील पहिल्या दिवशी ‘प्रि-शो’ म्हणून म्हणून साजरा केला जाईल. पुढे सर्वांसाठी हा कलामहोत्सव खुला केला जाईल. रोज वेगवेगळे कलासंगित विषयक उपक्रम साजरे करणार आहेत.
आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला नव्या वळणावर उभी आहे. कलाक्षेत्रात नवे प्रयोग, संदर्भ, विचार एकमेकांना पुरक ठरावेत आणि यातून कोल्हापूर कलाक्षेत्र आधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, स्थानिक कलावंताच्या कलाकृतीना बाजारपेठ मिळावी हा प्रयत्न या कोल्हापूरच्या कलामहोत्सवाच्या आयोजनाचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. असे अजय दळवी आणि प्रशांत जाधव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विजय टिपूगडे, संजय देसाई संपत नायकवडी डी. डी. पाटील,संजीव संकपाळ, एस. निंबाळकर, अस्मिता जगतात आदी उपस्थित होते.
Leave a Reply