
कोल्हापूर :नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री आंबाबाईच्या विविध रुपांचा जागर केला जातो. तिची त्र्यंबोली देवीशी होणारी भेट, उत्सवमूर्ती, तसेच विविध रुपात बांधलेल्या पूजांचे दर्शन आता रोजच होणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने श्री आंबाबाई दिनदर्शिका 2019 या नव्या वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन सोमवारी गरुड मंडप येथे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.ते म्हणाले” कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नवनवीन उपक्रम राबविले जातात.25 डिसेंबर ते 10 जानेवारी या काळात पर्यटक लाखोंच्या संख्येने श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतात. यावेळी भाविकांना या दिनदर्शिकेमुळे रोजच देवीचे दर्शन घेता येईल.
या दिनदर्शिकेत देवीचा किरणोत्सव, तिची उत्सवमूर्ती रुपातील पूजा, पालखी सोहळा, त्र्यंबोली देवी भेट, सिंहासनारुढ पूजा, नवरात्रोत्सव काळात लखलखणारे श्री आंबाबाई मंदिर अशा प्रतिमा या दिनदर्शिकेत आहेत. याप्रसंगी दिनदर्शिकेचं डिझाईन करणार्या युवराज शिंदे आणि शिवराज प्रिटींग प्रेसच्या केतन पाटील यांचा अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य संगिता खाडे, शिवाजीराव जाधव, साळवी आदी उपस्थित होते.
Leave a Reply