
नव्या वर्षात स्टार नेटवर्ककडून प्रेक्षकांना मिळणार आहे एक आकर्षक भेट. तुमच्या आवडीचे स्टार नेटवर्कचे सर्व चॅनेल्स फक्त 49 रुपयांत प्रेक्षकांना पहाता येणार आहेत. यात ‘स्टार प्रवाह’सोबतच स्टार प्लस, स्टार गोल्ड, स्टार भारत, स्टार स्पोर्ट्स आणि नॅशनल जिओग्राफिक या वाहिन्यांचाही समावेश असेल.भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण म्हणजेच ट्राय (TRAI)ने केबल ऑपरेटर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्ससाठी नवा आराखडा तयार केलाय. या नवीन निर्णयानुसार प्रेक्षकांना आपल्या आवडीचे चॅनेल्स निवडण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक जेवढे चॅनेल्स पाहतील तेवढ्याच चॅनेलचे पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. २९ डिसेंबरपासून हा नवा नियम लागू होणार आहे. त्यामुळे फक्त ४९ रुपयांत मिळणारा स्टार नेटवर्कचा हा स्टार व्हॅल्यू पॅक प्रेक्षकांसाठी अनोखी भेट ठरणार आहे.स्टार व्हॅल्यू पॅकबद्दल जनजागृती करण्यासाठी मराठीमध्ये#kharach हे कॅम्पेन राबवण्यात येतंय. सुपरस्टार स्वप्नील जोशीला या कॅम्पेनमध्ये सहभागी करण्यात आलंय. तर हिंदीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान#SachMein या कॅम्पेनद्वारे प्रेक्षकांना स्टार व्हॅल्यू पॅकची माहिती देताना दिसतोय. मराठी आणि हिंदीसोबतच मल्याळम, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि बंगाली या प्रादेशिक भाषांसाठी सुद्धा हे कॅम्पेन राबवण्यात येतंय,ज्यात अनेक कलाकार मंडळी सहभागी झाली आहेत. स्टार नेटवर्कच्या #kharach या अनोख्या कॅम्पेनला भरभरुन प्रतिसाद मिळतोय. स्टार प्रवाह वहिनीने आजवर नवनव्या कार्यक्रमांचा नजराणा प्रेक्षकांना दिलाय. नव्या वर्षातही हा सिलसिला कायम असेल. तेव्हा लवकरात लवकर या सुवर्णसंधीचा फायदा घ्या आणि २९ डिसेंबरच्या आत फक्त 49 रुपयांत स्टार व्हॅल्यू पॅक विकत घ्यायला विसरु नका.
Leave a Reply