
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असणारे तपोवन मैदान इथं 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी 2018 या भव्य कृषी आणि पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार पी एन पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. या कृषी प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती देताना आमदार सतेज पाटील यांनी शेतीची उत्पादन क्षमता कशी वाढेल तसेच शेतीतील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचावे या उद्देशाने या सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आलंय. या प्रदर्शनात 180 पेक्षा जास्त कृषी कंपन्यांचा सहभाग, तीनशे पेक्षा जास्त पशु पक्षांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनात शेती, दुग्धोत्पादन विषयक तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. विविध शेती अवजारे, बी बियाणे, खते आणि फुलांचे प्रदर्शन आणि विक्री याचा समावेश असणारे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं अवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी वर्गाचे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवासह मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळच्या सत्रात पोवाडे यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. विविध नामांकित कंपन्यांच्या स्टॉल्स बरोबर वेगवेगळी ट्रॅक्टर्सही शेतकऱ्यांना पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात तीनशेहून अधिक जातीवंत जनावरे असणार असून यामध्ये लाल गांधारी जातीची गाय, देवणी गाय, जर्षि, डॅनिष गायींचा समावेश असणार आहे. 30 ते 35 लिटर दुध देणारी जातीवंत खिलार गाय ही या प्रदर्शनात असणार आहे. वळू, पंढरपुरी म्हैस, रेडे, वनराज, टर्की, खडकनाथ कोंबड्याही पाहायला मिळणार आहेत. असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. या सतेज कृषी प्रदर्शनाचा समारोप 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबीटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. या पत्रकार बैठकीस उपमहापौर भूपाल, शेटे गटनेता शारंगधर देशमुख, कळंब्याचे सरपंच सागर भोगम, सत्यजित भोसले, अतुल जाधव, परवेश गुलेदिया , डॉ. सुनील काटकर, विनोद पाटील, धीरज पाटील, तानाजी पोवार, माजी नगरसेवक मधुकर रामाणे दुर्वास कदम, उदय जाधव, भगवान पाटील, शांकी मगदूम आदी उपस्थित होते.
Leave a Reply