
धम्माल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको. सरत्या वर्षाला हसरा निरोप देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे.स्टार प्रवाहवरील ‘येरे येरे १९’ या विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी मिळणार आहे. तुमच्या लाडक्या कलाकारांचा आजवर न पाहिलेला अंदाज या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणता येईल. या खास कार्यक्रमात नकळत सारे घडले मालिकेमधील नेहा-प्रताप, छत्रीवाली मालिकेतील मधुरा-विक्रम, ललित २०५ मधील नील भैरवी आणि छोटी मालकीण मालिकेतील श्रीधर-रेवती यांनी रोमॅण्टिक गाण्यांवर परफॉर्म करत माहोल खऱ्या अर्थाने रोमॅण्टिक केला.या धमाकेदार सेलिब्रेशनची रंगत खऱ्या अर्थाने वाढली ती ज्योती चांदेकर, गिरीश ओक, अशोक शिंदे, सुरेखा कुडची,आशा शेलार आणि धनश्री दवांगे यांच्या अफलातून परफॉर्मन्सने.रात्र जागूया…थोडं हटके वागूया असं म्हणत ही कलाकार मंडळी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. स्टार प्रवाहच्या ‘येरे येरे १९’ या विशेष कार्यक्रमातून ही सारी धमाल अनुभवता येणार आहे. तेव्हा ३१ डिसेंबरची रात्र रंगेल स्टार प्रवाहसंगे. पाहायला विसरु नका ‘येरे येरे १९’रात्री ९.३० वाजल्यापासून तुमच्या लाडक्या ‘स्टार प्रवाह’या वाहिनीवर.
Leave a Reply