रेनॉ इंडियाने सुरू केली ५ लाख विक्री टप्प्याची साजरीकरण मोहीम

 
कोल्हापूर: रेनॉ इंडिया ही कंपनी नुकताच ५ लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार करून, हे यश सर्वाधिक वेगाने साध्य करणाऱ्या ऑटोमोटिव ब्रॅण्ड्सच्या गटात जाऊन बसली आहे. भारत ही रेनॉसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून कंपनीकडे एक स्पष्ट असे दीर्घकालीन ‘भारत धोरण’ आहे. 
      अगदी थोड्या कालावधीत रेनॉने भारतात लक्षणीय प्रगती केली आहे. यामध्ये अत्याधुनिक उत्पादन कारखाना, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतात दोन डिझाइन सेंटर्स असलेला हा एकमेव जागतिक ब्रॅण्ड आहे. या भक्कम पायाला जोड लाभली आहे ती अनोख्या उत्पादन धोरणाची आणि ग्राहकांच्या समाधानासाठी घेण्यात आलेल्या अभिनव उपक्रमांची. रेनॉने साध्य केलेल्या यशात या सर्व घटकांचा निर्णायक वाटा आहे. 
      विक्रीतील हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी रेनॉने अनेक आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. क्विडवर रेनॉने इतर लाभांव्‍यतिरिक्‍त एक विशेष वित्तसहाय्याची ऑफर ० टक्के व्याजदराने देऊ केली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असेल. ९८ टक्के स्थानिकीकरणातून उत्पादित होणारी क्विड म्हणजे ‘मेक इन इंडिया’ची आजपर्यंतची सर्वांत यशस्वी गाथा आहे. भारतातील छोट्या कार्सच्या विभागात क्विडने क्रांती घडवून आणली आहे. ही आकर्षक, कल्पक आणि परवडण्याजोगी कार रेनॉ इंडियासाठी खऱ्या अर्थाने पट बदलून टाकणारी तसेच वाढीला चालना देणारी ठरली. या गाडीची २,७५,००० युनिट्स आतापर्यंत विकली गेली आहेत. क्विडचे यश आणखी पुढे नेत रेनॉ इंडियाने अलीकडेच नवीन क्वीड २०१८ फीचर लोडेड रेंज आणली आहे. ही रेंज मॅन्युअल आणि ऑटोमेटेड अशा दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांत उपलब्ध आहे. 
      रेनॉने डस्टर आणून भारतीय वाहन उद्योगात एक पूर्णपणे नवीन विभाग निर्माण केला. हा विभाग आता भारतीय वाहन उद्योगावर वर्चस्व गाजवत आहे. विक्रीचा पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याचे साजरीकरण म्हणून डस्टरचे आणखी दोन प्रकार कंपनीने आणले आहेत. यातील एक पेट्रोल-आरएक्सएस प्रकार आहे, तर दुसरा डिझेल- आरएक्सएस एएमटी प्रकार आहे. यामुळे डस्टर श्रेणी आता सुविधांनी अधिक समृद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे एसयूव्ही विभागातील पेट्रोलवरील तसेच ऑटोमॅटिक वाहनांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अधिक अनुकूलही झाली आहे. रेनॉ डस्टरची श्रेणी सर्वात व्यापक असून, यात डिझेल मॅन्युअल (85PS & 110PS), डिझेल एएमटी, डिझेल एडब्ल्यूडी; पेट्रोल मॅन्युअल आणि पेट्रोल सीव्हीटी यांचा समावेश आहे. 
      विक्रीचा टप्पा ओलांडल्याचे साजरीकरण आणि डिसेंबरच्‍या साजरीकरणाचा हंगाम एकाचवेळी आल्यामुळे रेनॉने कॅप्टर देखण्या नवीन चमकदार लाल रंगात रूफ रेल्ससह आणली आहे. अवाक करणारे बोलके डिझाइन, एसयूव्हीमधील सर्वोत्तम ग्राउंड क्लीअरन्स आणि ५०हून अधिक अव्वल दर्जाच्या तसेच विभागातील आघाडीच्या सुविधा कॅप्टरच्या अगदी सुरुवातीच्या मॉडेल्सपासून सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे एसयूव्ही विभागात कॅप्टरचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. डिसेंबर साजरीकरणाचा भाग म्‍हणून कॅप्टर मर्यादित कालावधीकरिता आकर्षक ऑफर्ससह उपलब्‍ध असेल. 
     डिसेंबरमधील या आकर्षक ऑफर्समुळे तसेच रेनॉ  आपल्‍या सर्व रेंजमधील कार्सच्‍या किंमती जानेवारी २०१९ पासून १.५ टक्‍क्‍यांनी वाढवणार असल्‍याचे ध्‍यानात घेता रेनॉ वाहन खरेदी करण्‍याकरिता ही योग्‍य वेळ आहे. वाढत्या गुंतवणूक किंमती आणि परकीय चलनवाढीतील चढ-उतार याच्‍या परिणामस्‍वरुप ही काहीअंशी भाववाढ करण्‍यात येणार आहे. 
     गेल्या काही वर्षांत रेनॉने भारतात भक्कम पाया स्थापन करण्यावर भर दिला आहे. बळकट उत्पादन धोरणासोबतच उत्पादन, नेटवर्कचा विस्तार आणि ग्राहकांना ब्रॅण्ड ओनरशिपचा अखंडित अनुभव मिळावा यासाठी अनोखे ग्राहककेंद्री उपक्रम या व्यवसायाच्या सर्व महत्त्वपूर्ण अंगांना समजून घेत कंपनी सातत्याने धोरणात्मक उपाययोजना करत आली आहे. या सर्व घटकांनी एकत्रितपणे भारतात रेनॉच्या वाढीला हातभार लावला आहे.
      रेनॉने नेहमीच चाकोरी मोडण्यावर तसेच नवकल्पनांवर भर दिला आहे. या नवीन उत्पादनांसह रेनॉने वाहन उद्योगात नवीन विभाग निर्माण केले आहेत. कंपनीची सर्व आगामी उत्पादनेही एकतर पूर्वीच्या विभागांची व्याख्या नव्याने करतील किंवा नवीन विभागच निर्माण करतील अशी खात्री कंपनीला आहे. 
      आणखी पुढे जात, रेनॉने भारतासाठी एक भक्कम उत्पादन-आक्रमक (प्रोडक्ट-ऑफेन्सिव) योजना तयार केली आहे. यामध्ये कंपनीच्या आगामी उत्पादनश्रेणीसाठी स्थानिकीकरणावर मोठा भर देण्यात आला आहे. ग्राहकांच्‍या वाढत्‍या गरजा आणि प्राधान्‍यांची पूर्तता करण्‍याकरिता उत्पादन व सेवांमध्ये अनेक नवकल्पना आणण्याची रेनॉ इंडियाची योजना आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!