लँड रोव्हर जर्नीज खास लँड रोव्हर बाळगणा-यांसाठी भारतात सादर

 

मुंबई: लँड रोव्हर जर्नीजची रचना खास लँड रोव्हर गाड्या बाळगणा-यांसाठी करण्यात आली आहे, आपल्या गाडीच्या क्षमतांचा पूर्ण आवाका जाणून घेणे त्यांना यामुळे शक्य होणार आहे. कोगर मोटारस्पोर्टसतर्फे आयोजित लँड रोव्हर जर्नीजमध्ये देशातील बहुविध सांस्कृतिक आणि भौगोलिक वारशातील अनोखा अनुभव मिळू शकेल
लँड रोव्हर जर्नीजची सुरुवात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात होणा-या ‘ब्रम्हपुत्रा एक्स्परिअन्स’ने होईल.जग्वार लँड रोव्हर इंडियाने ‘लँड रोव्हर जर्नीज’ सादर करत असल्याची घोषणा केली आहे. भारतातील लँड रोव्हर गाड्यांच्या मालकांसाठी कोगर मोटरस्पोर्टतर्फे हा खास उपक्रम आखण्यात आला आहे. ‘लँड रोव्हर जर्नीज’ हा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा एक अनोखा अनुभव असेल. यात ग्राहकांना आपल्या लँड रोव्हरसोबत भारतातील अत्यंत सुंदर अशी संस्कृती आणि विविध भूभागांचा अनुभव घेता येईल. शिवाय, या प्रवासात त्यांना आपल्या लँड रोव्हरच्या क्षमतांनाही जोखता येईल.
रोहित सुरी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, जग्वार लँड रोव्हर इंडिया म्हणाले:
“लँड रोव्हर गाडीच्या प्रख्यात क्षमतांमधून साहसाची नवे दारे खुली होतात, ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यातील काही खास आणि संस्मरणीय अनुभव मिळतात. लँड रोव्हर जर्नीजच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांशी अधिक सखोल स्तरावर जोडले जाण्याचा आणि ते आयुष्यभर जपून ठेवतील असा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
पहिली ‘लँड रोव्हर जर्नी’ ब्रम्हपुत्रा एक्स्परीअन्स असेल. ईशान्य भारतात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात हा उपक्रम पार पडेल. कोगर मोटरस्पोर्टसमधील प्रशिक्षित लँड रोव्हर इन्स्ट्रक्टर्स हा प्रवास आणि त्यातील इतर बाबींची काळजी घेतील. ‘लँड रोव्हर जर्नीज’ संदर्भातील अधिक माहिती landrover.in येथे उपलब्ध आहे.
भारतात उपलब्ध असलेली लँड रोव्हर उत्पादने
भारतातील लँड रोव्हर मालिकेत पुढील गाड्यांचा समावेश होतो: डिस्कव्हरी स्पोर्ट Discovery Sport (किंमत ४४.६८ लाख रुपयांपासून पुढे), रेंज रोव्हर इव्होक Range Rover Evoque (किंमत ५२.०६ लाख रुपयांपासून पुढे), ऑल-न्यू डिस्कव्हरी All-New Discovery (किंमत ७४.९५ लाख रुपयांपासून पुढे), न्यू रेंज रोव्हर वेलार New Range Rover Velar (किंमत ८२.९० लाख रुपयांपासून पुढे), रेंज रोव्हर स्पोर्ट Range Rover Sport (किंमत १०२.४६ लाखांपासून पुढे) आणि रेंज रोव्हर Range Rover (किंमत १७९.५२ लाख रुपयांपासून पुढे). या सर्व किंमती भारतातील एक्स शोरूम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!