पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

 

कोल्हापूर : कुस्ती, बैलगाडी शर्यती आणि कृषी प्रदर्शन याला पश्चिम महाराष्ट्रातील लोक जास्त पसंत करतात. त्यामुळे सतेज कृषी प्रदर्शन नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त दालन ठरेल. असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचे उदघाटन कळंबा इथल्या तपोवन मैदानावर आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, माजी मंत्री जयंतराव आवळे, माजी मंत्री प्रकाश आवडे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील, माजी आमदार के पी पाटील प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील, युवा नेते ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाले. या उदघाटनाप्रसंगी बोलतांना आमदार हसन मुश्रीफ यांनी कुस्ती, बैलगाडी शर्यती आणि कृषी प्रदर्शन याला पश्चिम महाराष्ट्रातील लोक जास्त पसंत करतात. त्यामुळे सतेज कृषी प्रदर्शन नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त दालन ठरेल. असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. जिल्ह्याच्या पश्चिम भागात 69 दिवस सूर्याचे दर्शन झाले नाही त्यामुळे या भागात ऊसाचे पिक धोक्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना 2000 कोटींचे पीक कर्ज दिल आहे. जर ऊसाला दर मिळाला नाही तर बँकेचे कर्ज फिटणार कसं हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे.
जर या भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतला नाही तर राजस्थान मध्यप्रदेश, छत्तीसगड सारख झाल्याशिवाय राहणार नाही. असा टोलाही आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी लगावला. तसेच आगामी निवडणूकिसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आता निष्ठेने राहण्याची गरज आहे. आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. आपण सर्वांनी गेल्या 10 – 15 वर्षात ज्या चूका केल्या त्याची फळ भोगत आहोत. काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांनी एकत्र राहून पुन्हा एकदा सत्ता संपादन करूया अस आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं

यावेळी उदघाटनाप्रसंगी बोलतांना आमदार सतेज पाटील यांनी मागच्या वर्षांपासून कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी या वर्षीही या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शिरोळ तालुक्यात अतिरिक्त खतांच्या वापराने कॅन्सरचे वाढते प्रमाण याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस ऊसाचे उत्पादन घटत आहे. शेतीसाठी काढलेले पीक कर्ज फेडता येईल का ही परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. सध्या साखरेचे भाव वाढत नाही कारखानदारांना एफआरपी देणं शक्य नाही. त्यात उत्पन्न कमी त्यामूळे साखर कारखानदार यांच्या समोर समस्या निर्माण झाली आहे. यंदा ऊसाचे सरासरी उत्पादन 15 ते 20 टनांनी कमी आले आहे. शेतकरी मोठ्या अडचणीतून जातोय मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेत नाही. त्यामुळे साखर उद्योग आणि शेतकरी चक्रव्यूहात अडकला आहे. अस मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच ऊस उत्पादनात जसा जिल्हा ओळखला जातो तसा दुधाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यासाठी या कृषी महोत्सवात तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवले आहे. कोल्हापुरात आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी 14 भाजीपाल्याच्या बियांचे किट कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील शेतकऱ्यांना मोफत देणार आहे. 15 जानेवारी पर्यंत दक्षिण मतदार संघातील प्रत्येक घरात हे किट देणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील यांनी शेती उत्पादन वाढले पाहिजे. शेतकऱ्यांना सेंद्रिय बियाणे द्यावेत असं सांगितलं. तसेच मी जिथं आहे तिथं प्रामाणिक काम करत आहे सर्वांच नेत्यांनी प्रामाणिक राहावे. अस आवाहनही पी एन पाटील यांनी केलं. यावेळी माजी आमदार के पी पाटील यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे अनेकजण प्रयत्न करत आहेत. आमदार सतेज पाटील हे या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चालना देत आहेत. यंदा ऊसाचे उत्पादन निम्याने घटले आहे. शेतकऱ्यांना या सरकारने मदत करण्याची गरज आहे. उत्तर प्रदेश,धतीसगड मध्यप्रदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मात्र हे सरकार काहीच करत नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी रिकामी करतो असं जाहीर करतात मात्र प्रत्येकक्षात काहीच करत नाहीत. अशी टीका माजी आमदार के पी पाटील यांनी केली. तसेच आमदार सतेज पाटील यांनी बियाणांचे किट फक्त दक्षिण साठी न देता कोल्हापूर लोकसभ मतदार संघासाठी द्याव्यात अस मत के पी पाटील यांनी व्यक्त केलं.
यावेळी माजीमंत्री जयवंतराव आवळे यांनी याठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. भारत हा कृषी प्रदान देश आहे. आपण सहकार चळवळीत काम करणारे नेते आहोत. हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूया आणि हातामधून हात घालून काम करूया. लोकसभा निवडणूक जवळ येत आहे त्यासाठी एकत्र राहून काम केले पाहिजे. शेतकऱ्यांची परिस्थिती बदलायची असले तर कृषी प्रदर्शन पाहण्याबरोबर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. अस मत माजीमंत्री जयवंतराव आवळे यांनी व्यक्त केलं.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शेतकरी आज अतिशय हवालदिल आहे. टोमॅटोला दर मिळत नाही. कांदा रस्त्यावर फेकून देण्याची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांनी नेमकं कोणतं पिक घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. एफआरपी एकाचवेळी देण्यासारखी कारखानदारांची परिस्थिती नाही. कारखानदारांना एक रुपये देऊ नका शेतकऱ्यांना एफआरपीसाठी 500 रुपयांचे अनुदान द्या अन्यथा साखरेला 3400 रुपये दर द्या.
हे सरकार शेतकऱ्यांचे नाही ही खात्री आता झाली आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले. या सरकारला लॉटरी लागली होती. आता शेतकरी सोडणार नाहीत पुन्हा एकदा बळी राजाचे राज्य येईल असा विश्वास प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतेज कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी दिनकरराव जाधव, संजीवनीदेवी गायकवाड, ए. वाय. पाटील, सुरेश साळोखे, नगराध्यक्ष अमरसिंग पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील, रुपाली धडेल, विजयसिंग मोरे, महेश पाटील, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, गुलाबराव घोरपडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, अंजनाताई रेडकर, सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, मंगल कांबळे, राजू सूर्यवंशी, बाबासाहेब लाड, विजयराव पाटील, सागर पाटील, धीरज पाटील, तौफिफ मुलाणी, रिलाईन्स पोलीमर्सचे सत्यजित भोसले, निलोन्सचे संजय सिंग, विनायक भोसले, तानाजी पोवार, जिल्ह्यातील सर्व सभापती-उपसभापती, ग्राहक, आयोजक आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेले शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!