
कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. खासदार राजू शेट्टीशेतकऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी शिवार, बाजार ते राजकारण यावर नजर ठेवून सरकारच्या शेती विरोधी धोरणावर अंकुश ठेवाला पाहिजे, असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं. ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून तपोवन मैदान इथं आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचा सांगता समारंभ खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश अबीटकर, महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, युवानेते ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सांगता समारंभाप्रसंगी बोलतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतीमधले नवनवे प्रयोग अधिक चांगले व्हावेत यासाठी हे कृषी प्रदर्शन तरुण आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. सध्याचा काळात शेतीवरील खर्च वाढत चालला आहे. शेतीमाल विकून येणारा मोबदला कमी होत आहे. शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव हा बाजारात ठरतो त्यामुळे शेतकऱ्यामध्ये दुरावा वाढत आहे. तसेच तुकड्याची शेती जास्त होत चालली आहे. तुकड्याची शेती होत असल्याने खर्च वाढत आहे. ही आपली मूळ समस्या आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न मुळापर्यंत सुटत नाही तोपर्यन्त आमची संघर्षाचीची भूमिका राहील असं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्याची पहिली नजर शिवारात, दुसरी नजर बाजारात आणि तिसरी नजर राजकारणात असली पाहिजे. शेतीच्या धोरणावर अंकुश ठेवण्यासाठी शेतकऱ्याने राजकारणात असलं पाहिजे असं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.आता विरोधकांना मी भस्मासुर वाटू लागलो आहे ते काहीही म्हणोत याचा मला फरक पडत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य कळावे अशी आमची भूमिका या संघर्षामागे असते. सरकारला जागे करून तशी धोरणे करायला लावले पाहिजे. राज्यातल्या शेतकऱ्यांची अडचण काय आहे ते दिल्लीत सांगावे लागते. एफआरपी देण्याच्या प्रश्नावरून मोठं आंदोलन झाले तेंव्हा एफआरपीसाठी केंद्र सरकारने काहीतरी द्यावे असे सांगीतले. त्यावेळी मनमोहन सरकारने 5000 कोटी रुपयांची मदत केली. सरकार म्हटतंय 80 टक्के एफआरपी घ्या मात्र 100 टक्क्यांच्याखाली एक रुपया सुद्धा कमी घेणार नाही काय वाटेल ते होऊदे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलाय, जीएसटीचा भार बसतोय शेतकऱ्यांची फसवणूक केलीय. खतांच्या किमती वाढत चालल्या आहेत. उत्पादन खर्च वाढल्यामुळेच शेतकरी अडचणीत आलाय. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत गेलाय. विजेचा दर वाढलाय, साखर कारखान्यात वीज निर्मिती होते त्याबाबत काय बोलत नाही. साखर कारखान्याकडून मोठा कर घेतात. साखर कारखाने राज्यातील 9 लाख लोकांना रोजगार दिला जातो. जर आम्ही ऊस लावला नसता तर या 9 लाख लोकांना सरकारने कुठला रोजगार दिला असता. 80 टक्क्यांनी आमचे कर्ज फिटेल काय. आमची अडचण समजून घ्या. साखर कारखानदारांनी पहिला आमचं देणं द्या कराची रक्कम थकवा आम्ही तुमच्याबरोबर येऊ बघू सरकार काय करतंय. 450 रुपयाची हमी सरकारने घेतली तरी हा प्रश्न मिठतोय. यासाठी साखर कारखानदारांनी आमच्या बरोबर यावं अन्यथा शेतकरी कारखानदार संघर्ष करावाच लागणार आहे. हे सरकार लबाड आहे हे देणार नाही. सरकारला अद्दल घडविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. 25 हजार कोटींची जी थकबाकी दिसते ही बोगस आहे. 21 जानेवारीला विजेच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी बदलत्या काळात शेती आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येते. भविष्यात शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना चालना देणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार संपत बापू पाटील यांनी देशात शेतकऱ्यांबद्दल कळवळा असलेली माणसे फार कमी आहेत. लोकप्रतिनिधी फक्त राजकारणासाठीच शेतकऱ्यांचा वापर करतात. शेतकऱ्यांचा माल हा आधारभूत किमतीवर विकला जातो. दलालांपासून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवली पाहिजे. सरकार रोज शेतकऱ्यांची थट्टा करते. 14 दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक होते तर आता कायदा गेला कुठं असा सवाल माजी आमदार संपत बापू पाटील यांनी उपस्थित करत हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने नसल्याचे सांगितले.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा संजय मंडलीक यांनी देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेती करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. तरीही शेतीत रस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आणून ठेवलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आमदार सतेज पाटील यांचे वय जरी कमी असले तरी सर्वांना बरोबर घेऊन जातात. आगामी काळात त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका घेऊन आम्हाला साथ द्यावी. असं अवाहन प्रा संजय मंडलीक यांनी केलं.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी आमदार सतेज पाटील यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट व्यासपीठ उपलब्ध करून दिल आहे. पुढच्या काळात आमदार सतेज पाटील कोणतं आधुनिक बियाणे घालणार आहेत हे ऐकायला इथं सर्व बसले आहेत. या सरकारच्या काळात एफआरपी एकरकमी देणं कारखानदारांना शक्य नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न व्हावेत. या सरकारच्या धोरणामुळे साखर कारखानदारी संपली नसली पाहिजे. आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीला सोबत घेतलंय तसं आम्हालाही घेऊन धनुष्यबाण हातात घ्यावा. आमदार सतेज पाटील हे आमच्यापेक्षा लहान असले तरी ते राजकारणात जास्त अनुभवी आहेत. कुठं नांगरट करायची कुठं काय पेरायचे हे त्यांना चांगलं माहीत असल्याचं आमदार नरके यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी या प्रदर्शनाला एवढ्या प्रमाणात शेतकरी प्रतिसाद देत असतील तर हे प्रदर्शन शेतकऱ्यांना उपकयुक्त आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अनेकजण म्हणतात कर्ज माफी झाली पाहिजे पण कर्ज माफी बरोबर त्या शेतकऱ्याला पुन्हा चालना देणे गरजेचे आहे. सर्वच घटकांनी शेतकऱ्यांना सक्षम केलं पाहिजे. असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
तर आमदार प्रकाश अबीटकर यांनी हे प्रदर्शन रेकॉर्ड ब्रेक आहे. शेतकऱ्यांना नवनवीन साहित्यांची उपलब्धता करून दिली. सध्याच्या काळात असे प्रदर्शन भरविणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनात मिळतात. शेतकरी राजा सुखवायचा असेल तर शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोचविण्याबरोबर आशा प्रदर्शनाची गरज असल्याचं आमदार अबीटकर यांनी सांगितलं.
यावेळी अतुल जाधव, प्रा. जयवंत जगताप जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सागर पाटील, भगवान काटे, दशरथ माने, विनोद पाटील, शारंगधर देशमुख, धीरज पाटील, अर्जुन माने, गगनबावडा पंचायत समिती उपसभापती पांडुरंग भोसले, भगवान पाटील, बजरंग पाटील, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, उमा बनछोडे, अश्विनी रामाणे, प्रतिक्षा पाटील, शाहूवाडी सभापती संगीता पाटील, कागल पंचायत समिती सभापती राजश्री माने, राधानगरी पंचायत समिती सभापती विजय कांबळे, विजय भोसले यांच्यासह निमंत्रीत मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Please let me know if you’re looking for a writer for your
weblog. You have some really great articles and I think I
would be a good asset. If you ever want to take some of
the load off, I’d really like to write some content
for your blog in exchange for a link back to mine. Please shoot me an email if interested.
Many thanks! http://Fabritrak.de/__media__/js/netsoltrademark.php?d=qmovie.com%2F__media__%2Fjs%2Fnetsoltrademark.php%3Fd%3D918.network%2Fcasino-games%2F78-live22