
कोल्हापूर:वैद्यकीय क्षेत्रात होत असणारे नवनवीन बदल डॉक्टरांना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व फिजिशियन्ससाठी असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्या वतीने कॅपिकॉन- 2019 या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन 5 व 6 जानेवारी रोजी हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष तन्मय व्होरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष डॉ. अमृत सुलताने, मानद सचिव डॉ. प्रकाश शारबिद्रे, संयुक्त सचिव डॉ. राहुल दिवाण,कोषाध्यक्ष डॉ. अमोल खोत,डॉ. साईप्रसाद यांनी याबाबतची भूमिका विशद केली.
सदर परिषदेमध्ये 5 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 4 दरम्यान पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरी सत्र घेण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी 4 ते 8 पर्यंत वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनामध्ये ‘रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आजारांवर’ निरनिराळ्या क्षेत्रांमधील तज्ञ यामध्ये डॉ. हिम्मतराव बावसकर,डॉ. अमित द्रविड, डॉ. प्रवीण पाटील,डॉ. गोपीनाथ शेनॉय यांच्याकडून मार्गदर्शन मिळणार आहे. परिषदेचे उद्घाटन रविवारी दुपारी साडे अकरा वाजता डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच डॉ. प्रकाश बाबा आमटे हे डॉक्टर एस.के. कुलकर्णी यांचे स्मरणार्थ घेणारे व्याख्यान देणार आहेत. याचबरोबर निरनिराळ्या चर्चासत्रामध्ये प्रख्यात विशेष तज्ञ डॉ.कन्नन सुब्रमण्यम, डॉ. साजीव बाबू, डॉ. अंजली भट्ट,डॉ. मदन बहादुर, डॉ.शर्वील गाढवे, डॉ.अर्जुन आडनाईक, डॉ. चंद्रशेखर पाटील हे तज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून 300 पेक्षा जास्त चिकित्सक उपस्थित राहणार आहेत.
Leave a Reply