
कोल्हापूर:पत्रकारांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार भारतकुमार राऊत आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा महापौर सरिता मोरे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्काराने गौरविले जाते.
यंदाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुनील पाटील (मुद्रित माध्यम), दैनिक सकाळ ,उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार अर्जुन टाकळकर, दैनिक महाराष्ट्र टाईम्स, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार(इलेक्ट्रॉनिक माध्यम) विजय केसरकर, TV9 मराठी, संदीप राजगोळकर, Network 18 लोकमत यांना विभागून आणि उत्कृष्ट कॅमेरामन पुरस्कार अभिजीत पाटील, एस न्यूज यांना जाहीर करण्यात आला आहे.
६ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे समारंभपूर्वक या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी “पत्रकार समाजाचे चौकीदार” या विषयावर भारतकुमार राऊत मार्गदर्शन करणार आहेत.
तरी कार्यक्रमास सर्व प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, कार्याध्यक्ष सदानंद पाटील आणि सचिव बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply