
कोल्हापूर – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, ६ जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता महापालिकेचे शाळा क्रमांक ९ चे मैदान, लकी बझारशेजारी, राजारामपुरी, कोल्हापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समिती ही धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण या पंचसूत्रीवर हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करणारी संस्था आहे. याचाच एक भाग म्हणून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खाडये, तसेच सनातन संस्थेच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख राजुु यादव, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शरद माळी उपस्थित होते.
सभेसाठी पंचक्रोशीतील १००हून अधिक गावांमध्ये प्रसार करण्यात आला असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत. या सभेच्या प्रसारासाठी गुरुवार, ४ जानेवारी या दिवशी वाहनफेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी दुपारी चार वाजता महापालिकेचे शाळा क्रमांक ९ चे मैदान येथून प्रारंभ होईल, तरी अधिकाधिक हिंदूंनी या फेरीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आज ‘सेक्युलरवादा’च्या नावाखाली अल्पसंख्याकांचे लांगूलचालन चालू आहे. जर केवळ ८५ लाख ’ज्यू’ धर्मियांचे ’इस्रायल’ हे ‘ज्यू’ राष्ट्र बनू शकते, तर १०० कोटी हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र्र’, का बनू शकणार नाही ? ते संवैधानिक मार्गाने साकार करण्यातील आपली भूमिका समजून घेण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले आहे.
Leave a Reply