३ फेब्रुवारीला बिनखांबी गणेश मित्र मंडळातर्फे राज्यस्तरीय कोल्हापूर शाहू मँरेथाँंन स्पर्धा

 

कोल्हापूर:कोल्हापूरात श्री बिनखांबी गणेश मित्रमंडळाच्या वतीने समता, साक्षरता व क्रिडा विकास हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विचार युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा रविवार दिं.३फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय कोल्हापूर शाहू मँरेथाँंन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे २४ सावे वर्ष असून १५गटात ही स्पर्धा होणार आहे. तर या स्पर्धेमध्ये विजेत्यांना सुमारे दीड लाखांची रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे वाटप केली जाणार आहेत.अशी माहिती कोल्हापूर राज्यस्तरीय शाहू मँरेथाँंन संयोजन समितीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत झुरळे व मंडळाचे अध्यक्ष किसन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी स्पर्धेचे ‘मुलांना सोशल मिडीयापासून दूर ठेवा-वाचन संस्कृती वाढवा’.
हे घोषवाक्य आहे. या स्पर्धा खुला पुरुष गट,खुला महिला गट,शालेय मुले,मुली वयवर्ष १०,१२,१४,१७ गटासाठी तर दिव्यांग वयोगट १४ ते १७ गटास होणार असून या संपूर्ण स्पर्धेत अनुक्रमे २१हजार पासून २०० रुपये पर्यंत विजेत्यांना रोख बक्षीसे वितरित होणार आहेत.तसेच प्रौढ व शालेय मुले-मुली गटांसाठी वयाचा दाखला आवश्यक आहे. स्पर्धेची नांव नोंदणी दि.१५ जानेवारी पासून सुर होणार आहे.तरी स्पर्धकांनी बिनखांबी गणेश मित्र मंडळ कार्यालय, दर्शन दौलत अपार्टमेंट, भूमाई लॉन्ड्रीसमोर, बिनखांबी गणेश मंदीर नजिक नोंद करणेची आहेत. नांव नोंदणीची अंतिम तारीख दि.२ फेब्रुवारी रोजी सायं५ वा.पर्यंत राहील. स्पर्धेत स्पर्धा क्रमांक असल्याखेरीज स्पर्धकांना सहभागी होता येणार नाही.खुला पुरूष गटासाठी २०० रु.खुला महिला गट रू.१००रु, प्रोढ पुरूष व महिला गटासाठी ५०रुपये प्रवेश फी राहणार असून शालेय १०, १२, १४ व १७ वर्षांखालील गटासाठी मोफत प्रवेश राहील.अशी माहिती शाहू मॅरेथॉन संयोजन समिती कार्याध्यक्ष- चंद्रकांत झरळे, उपकार्याध्यक्ष प्रतापसिंह घोरपडे,मंडळाचे अध्यक्ष किसन भोसले ,सचिव दत्ताजी कदम,संदिप जाधव, यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!