
कोल्हापूर : कोल्हापुरात अभिसार मल्टिमीडिया प्रोडक्शन्स हा सुसज्ज आणि अद्ययावत रेकॉर्डिंग आणि मल्टिमीडिया स्टुडिओ उभा राहिला आहे. त्याचं कॉर्पोरेट अनावरण शनिवार , दिनांक २६ जानेवारी २०१९ रोजी पार पडत आहे अशी माहिती अभिसार मल्टिमीडिया प्रोडक्शन्सचे तुषार दिवेकर आणि ऋषिकेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२६ रोजी या स्टुडिओला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने ग्राहकांशी असलेले नाते अधिकाधिक दृढ करण्यासाठी आणि काही नाती नव्याने जोडण्यासाठी अभिसार मल्टिमीडिया प्रोडक्शन्सच्या स्टुडिओचे कॉर्पोरेट अनावरण केले जाणार आहे.
गेल्या वर्षभरात अभिसार मार्फत साऊंड रेकॉर्डिंग, म्युझिक प्रोडक्शन, फिल्म डबिंग, डॉक्युमेंटरी मेकिंग, कॉर्पोरेट ब्रँडिंग अशा अनेक स्वरूपात सेवा पुरवण्यात आल्या. व्हॅल्यू ऍडीशन टू लाईफ हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा अनेक स्तरांवर कॉर्पोरेट जिंगल्स, कमर्शियल ऍडस, व्हिडीओ लेक्चर्स, विविध प्रकारच्या डॉक्युमेंटरीज अशा विविध सेवा अभिसार मार्फत पुरवल्या जात आहेत. अभिसार मल्टिमीडिया प्रोडक्शन्स च्या ऑडिओ विभागाने एका मराठी फिल्मच्या प्रमोशन साठी बनवलेले आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेले धिंगाणा हे गाणे लवकरच श्रोत्यांच्या समोर येत आहे. तसेच अभिसार ने शिवाजी चौक तरुण मंडळाच्या महागणपतीसाठी तयार केलेल्या गाण्याला श्रोत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
तुषार दिवेकर, ऋषिकेश कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी बांधव यांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या या स्टुडिओमध्ये जे जे मीडियाशी संबंधित ते ते सर्व ग्राहकांना अभिसार कडून प्राप्त होऊ शकतं. अभिसार ऑडिओ, अभिसार ग्राफिक्स आणि अभिसार मल्टिमीडिया या तीन विभागातून विविध सेवांची मालिकाच अभिसार पुरवत राहणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला तुषार दिवेकर, ऋषिकेश कुलकर्णी, पूनम फडणीस,बाहुबली राजमाने,चेतना पाटील,विनय जोशीलकर,अनुपम दाभाडे,भावना हांडे,उत्कर्षा बापट,सोनल दाबाडे,सुदर्शन खोत,सनथ पवार,उत्तरा पाटील,ऐश्वर्या पाटील,सतीश तांदळे आदी उपस्थित होते.
Leave a Reply