
कोल्हापूर : टाटा मोटर्सचे कोल्हापूर जिल्हयाचे एकमेव अधिकृत वितरक युनिटी मोटर्स प्रा. लि.च्या गोकूळ शिरगाव, कोल्हापूर येथील शोरूम मध्ये नविन “टाटा हॅरियर” या वाहनाचे प्रमुख पाहूणे भैयासाहेब कुपेकर व जयंत डांगरे (चेअरमन आणि मॅनेजींग डायरेक्टर युनिटी मोटर्स ) यांचे हस्ते मोठया दिमाखदार सोहळयात लॉचिंग करण्यात आले.यावेळी विवेक सावंत (डायरेक्टर युनिटी मोटर्स) गुरविंदर सिंग (CEO, युनिटी मोटर्स ) अजित कंडोर आणि सचिन सुरोनकर (TSM) सोलोमन सैम्युल (GM) अशोक भागवत (GM Workshop) हे मान्यवर उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जयंत डांगरे यांनी केले.पाहुण्यांचे व मान्यवर ग्राहकांचे आभार सोलोमन फ्रेम्युल GMयानी मानले.युनिटी मोटर्सचे जयकुमार (SMआणि सर्व स्टाफ उपस्थित होता.टाटा मोटर्सच्या नव्या दमदार टाटा हॅरीयर वाहनाच्या लॉंचिंग पूर्वी खास युक्रेन वरून आलेल्या बेली डान्सर ऍना हिच्या बेली नृत्याच्या आविष्काराने उपस्थित ग्राहक भारावून गेले.”टाटा हॅरियर ही टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध झाली आहे.”टाटा हॅरियर” ही गाडी अभूतपूर्व आणि अविश्वसनीय डिझाईन व फिचर्सने परिपूर्ण अशी बनविण्यात आली असून पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.या गाडीचे मोठया प्रमाणात बुकिंग सुरू झाले आहे.
Leave a Reply