
कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये गेली बारा वर्षापासून आयोजित करण्यात आलेले भीमा कृषी प्रदर्शन चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असून खा. धनंजय महाडिक यांनी मागील वर्षी शासन स्तरावर अनुदान मिळावे अशी विनंती केली होती मात्र यावर्षी देता आली नाही पुढील वर्षी शासन स्तरावरील अनुदान भीमा कृषी प्रदर्शनाला देईन असे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले खा.धनंजय महाडिक यांच्या वतीने आयोजित “भीमा कृषी व पशुप्रदर्शन २०१९” या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.येथील मेरी वेदर मैदान येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून आज या प्रदर्शनाचे शानदार उदघाटन फीत कापून करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची उपस्थिती होती.याठिकाणी २० फूट कोल्हापुरी चप्पल आणण्यात आले आहे याचेही उदघाटन ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये सोयीसुविधा वाढविणे व पैशाची व्यवस्था करणे गरजेचे आहे .रस्ते पूर्ण करायचे आहेत शेतीचा विकास झाला पाहिजे यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती होईल असे प्रदर्शन भरण्यात आले असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे सांगितले .खा .धनंजय महाडिक यांना उद्देशून बोलताना पाटील यांनी आपण सरकार चालविता आपल्याला अनुदानाची आवश्यकता नाही पुढील वर्षी अनुदान देऊ असे आश्वासन दिले .कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन गोष्टी आणत असतात हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट प्रदर्शन व मार्गदर्शक असल्याचे सांगितले .
तुम्ही आमच्या मनाप्रमाणे लग्न केले असते तर तुम्हाला खूप काही दिले असते मात्र आमच्या मनाविरुद्ध लग्न करूनही तुम्हाला आम्ही घरात घेणार पण खरे पाहता शिवसेना-भाजप युती होणार असून शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगितले.
माजी आमदार महादेवराव महाडिक ज्याला डोक्यावर घेतात त्यांना निवडून आणतात असेही सांगितले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार जयंत पाटील यांनी खबर धनंजय महाडिक यांना तीन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला असा खासदार मी आजपर्यंत पाहिला नाही असे सांगत प्रदर्शनातील १२ कोटी चा रेडा कसा असेल या उत्सुकतेपोटी मी उस्मानाबाद येथुन कोल्हापूर मध्ये आलो आहे धनंजय महाडिक दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवितात हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त प्रदर्शन असते जमीन कितीही असली तरी आपण त्या ठिकाणी काय करतो हे महत्त्वाचे असते हेच शेतकऱ्यांनी शिकणे गरजेचे आहे असे सांगून शेतीबरोबरच जोडधंदा करणे आज गरजेचे असल्याचे सांगितले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होणार आहे. २८ पासून कागलमध्ये परिवर्तन रॅली सुरू होणार आहे कोल्हापूरमध्येही यानिमित्त जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले .विकासाच्या संदर्भात आधारभूत किमतीचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे विपुल उत्पादन वाढल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दर पडला तरी उत्पादन खर्च निघणे आवश्यक आहे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
माजी आम.महादेवराव महाडिक बोलताना म्हणाले की, जोपर्यंत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानाची माहिती होत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही असे सांगून चार दिवस भीमा कृषी प्रदर्शन चालणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .
निवडणुकीमध्ये आम्हाला ज्योतिषाची गरज भासणार नाही महाडिकांची झोळी खूप मोठी आहे मतदारांनी व जनतेने आम्हाला मदत केली म्हणूनच आम्ही येऊ शकलो तीन वेळा खासदार होणे हेही त्यांचे श्रेय असल्याचे सांगितले ग्रामीण भागातील शेतकरी जगला पाहिजे यासाठी धनंजय महाडिक दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवितात असे सांगून आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा साखर उद्योग याविषयी आपले विचार मांडले .
यावेळी प्रास्ताविक भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रदर्शनाची माहिती उपस्थितांना दिली व प्रमुख पाहुणे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे अनुदान शासनाकडून मिळवून देण्याची विनंती केली सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे त्याविषयीची व मधमाशी प्रकल्पाविषयी माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार असल्याचे सांगितले.
उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर माजी आम. भरमूअण्णा पाटील, रामराजे कुपेकर ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई ,सौ.संगीता खाडे, नगरसेवक विलास वास्कर ,किरण शिराळे, आशिष ढवळे , तिरूमला ऑईल च्या अर्चना कुठे , अशोक सिद्धनेर्ली कर रिलायन्स पोलिमरचे सत्यजित भोसले ,दीपक पाटील जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील पृथ्वीराज महाडिक आदी उपस्थित होते.
यावर्षी प्रदर्शनाचे खास आकर्षण हे हरियाणा “सुलतान नावाचा रेडा” जो १२ कोटीं किंमतीचा आहे. “निलीरावी “ब्रीड (रेडा) आणण्यात आला आहे शिवाय महाराष्ट्रातील क्रॉकेज जातीचा “नंदीबैल “जो साडेसात फूटाचा आहे तोही प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे व २० फुटी “कोल्हापुरी चप्पल” हेही एक आकर्षण आहे.या मोठ्या आकाराच्या चप्पलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.
आज प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ५ महिलांना जिजामाता पुरस्कार जिल्ह्यातील ५ शेतकर्यांना शेती भूषण ,कृषी सहाय्यक ५ कृषी संशोधन व शास्त्रज्ञ ३ यासह जीवन गौरव, भीमा कृषी रत्न पुरस्कार तर १० शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आम.जयंत पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रदर्शनामध्ये ५०० पेक्षा जास्त विविध जातींची जनावरे शेतीसाठी उपयुक्त साहित्य व विविध उत्पादने असणारे ६५० स्टॉल आहेत.याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडीक यांच्या नेतृत्वाखाली २०० महिला बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत. ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला याठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.प्रदर्शनाच्या चारही दिवस शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप केले जाणार आहे.आज हजारो शेतकर्यांनी याचा लाभ घेतला.
देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्स यांचे या प्रदर्शनास प्रायोजकत्व लाभले आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, कोल्हापूर नॅशनल कमिटी ऑफ प्लास्टिक अॅपलिकेशन इन हॉर्टीकल्चर (एन.सी.ए.पी.एच)यांचे सहकार्य लाभले आहे.
भीमा कृषी प्रदर्शनात मुऱ्हा जातीच्या म्हैशी ,रेडे,शिवाय लाल कंधारी गाय, पंढरपूरी मधील गायी व रेडे,म्हैस, दिवसाला ४० ते ४५ लिटर दूध देणारी जर्सी गाय, संकरित गाई ,म्हैशी विविध तोतापुरी उस्मानाबादी शेळ्या,बोकड,शंभर ते दीडशे किलो वजनाचे बोकड तसेच गिरीराज ब्लॅक अस्ट्रोलॅप, कडकनाथ कोंबड्या,टर्की कोंबड्या,तीस ते पस्तीस किलो वजनाचे बटेर पक्षी,ससे,गिनींपिक उंदीर,गीज,बदके,परदेशी पक्षी,जातिवंत घोडे,वराहपालन, लातूर वरून देवणी गाय व कुंडल गायी,वेगवेगळे पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती या प्रदर्शनामधून पाहावयास मिळणार आहेत .
उद्या२६ जानेवारी रोजी “कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना व स्वयंचलित सिंचन व्यवस्थापन” या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकरे आपले विचार मांडणार आहेत . शिवाय “ऊस लागवड काळाची गरज “या विषयावर माजी शास्त्रज्ञ डॉक्टर .जे.पी. पाटील हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर वसंत दादा साखर संस्था पुणे चे माजी संचालक डॉ.डी.जी.हापसे हे ” कमी खर्चातील शाश्वत ऊस लागवड “याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार .व ९० संगणकाचे वाटप केले जाणार आहे.
२७ जानेवारी रोजी “शेडनेट/ पॉलिहाऊस मधील देशी व परदेशी भाजीपाला /बियाणे उत्पादन प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन आणि कृषी पूरक व्यवसायातील विविध संधी” या विषयावर उद्यान विद्यावेता प्राध्यापक विजय कुमार कानडे हे मार्गदर्शन करणार आहेत .”चारा व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती “या विषयावर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.जे.ए.पठाण हे मार्गदर्शन करणार आहेत .”रिलायन्स पोलिमरच्या साधन सामुग्रीचा आधुनिक शेतीसाठी वापर” या विषयावर रिलायन्स पोलिमरचे जनरल मॅनेजर सत्यजित भोसले मार्गदर्शन करणार आहेत.
आज सायंकाळी ७ ते ८.३० यावेळी ऋषिकेश रोट्रॅक्ट क्लब यांचा अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा पार पडला.उद्या २६ रोजी सायंकाळी ६ ते ८.३० वाजता महापथनाट्य स्पर्धेचा अंतिम सोहळा होणार आहे .
कृषी विभागाच्या वतीने ही चार दिवसानंतर उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा,पिकस्पर्धा,पशुस्पर्धाची बक्षिसे दिली जाणार आहेत. आत्मा च्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे. प्रदर्शनात तांदूळ महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे.या तांदूळ महोत्सवामध्ये आजरा घणसाळ ,भोगावती,दप्तरी, इंद्रायणी अशा विविध नमुन्यांचे तांदूळ खरेदी करता येणार आहे.प्रदर्शनाच्या ठिकाणी ७८८७८१५५७७ या नंबरवर मिस्ड कॉल केल्यानंतर गिफ्ट दिली जाणार आहेत
या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजक भीमा उद्योग समूहासह क्रिएटिव्ह एक्झिबिशन अँड इव्हेंट संस्थेने केले आहे.या प्रदर्शनासाठी रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले,डॉ.सुनील काटकर,श्रीधर बिरंजे,कृषी विभागाचे अतुल जाधव,अशोक सिद्धनेरली ,डॉ.अजित शिंदे,जे.पी.पाटील,धनवडे सर तसेच क्रिएटिव्हचे सुजित चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.
Leave a Reply