कोल्हापूर :”आरोग्यविश्वातील विविध सेवा देणाऱ्या संस्था -व्यक्ती तसेच सामाजिक क्षेत्रातील एनजीओच्या फोन नबंरसह माहिती असलेल्या शायरन फिचर्सची आरोग्य दिनदर्शिक ही नेमक्या समन्वयासह मोलाची ठरेल ” अश्या शब्दात आपल्या शुभेच्छा डाँ.विलास देशमुख यांनी व्यक्त केल्या .त्यांच्यासह मान्यवराच्या हस्ते सीपीआर परिसरात यांचे प्रकाशन करण्यात आले. प्रांरभी मान्यवराचे स्वागत करुन समन्वयक राजेंन्द्र मकोटे यांनी ” आरोग्य दिनदर्शिकेमध्ये राज्यशासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दवाखान्याचे पत्ते आणि संपर्काचे फोन क्रमांक ,तसेच कर्नटक शासनाच्या आरोग्यश्री योजनेत सहभागी दवाखाने यांचीही माहिती देण्यात आलेली आहे.यासह जिल्ह्यातील ब्लडबँकासह सर्पे-पक्षीमित्र ,रक्तदान – नेत्र-अवयवदान प्रचारासाठी कार्यरत तसेच आपत्तकालीन कधीही मदतीसाठी स्वयंस्फुर्तीने उपलब्ध कार्यकर्ते यांचे भ्रमणघ्वनी क्रंमाकही देण्यात आले आहेत.शासनाच्या १०८ सह वीसहुन अधिक स्वयंसेवी रुग्णवाहिका चालकाचे ही नबंर यात आहेत.यासह जिल्हा परिषदेच्या ७२ ग्रामीण रूग्णालयाचे तालुकानिहाय फोन नंबर देण्यात आले आहेत.अनुलोम लोकराज्य महाभियानचे बारा समन्वयक यांचीही फोन संपर्कसह माहिती देण्यात आली आहे.यासह जिह्यातील एनजीओ फोरमच्या सावली – माऊली -मातोश्री वृघ्दाश्रम-कोहम -सेतू-सक्षम-परमधाम-व्हाईट आर्मी -सह महावीर सेवाधाम – सेतु – सक्षमसह सक्रीय एनजीओ ची माहिती देण्यात आल्याचे सांगितले. तसेच भविष्यात डायरी स्वरुपात यांची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.शासनाच्या विविध २५ आरोग्य दिनाची माहिती ही संदर्भासह देण्यात आली आहे. या आरोग्य दिनदर्शिका सीपीआर परिसरात अतुल पाटील – जीवनधारा मेडीकल , तागारे न्युज पेपर,आहार हाँटेल जवळ ,मंगळवार पेठआणि समर क्राऊन ,तिसरा मजला,मातोश्री प्लाझा व्हिनस येथे ऊपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळी सीपीआर च्या डाँ.सुप्रिया देशमुख ,डाँ.बनसोडे तसेच मराठा महासंघाचे वंसतराव मुळीक,डाँ.संदीप पाटील,लोकसंग्राम संघटनेचे डाँ.आनंद गुरव,यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.या वेळी जीव धाराचे दत्तप्रसाद चांदेकर ,महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे किरण गोंदलकर – डाँ.सुभाष नांगरे,आर वन हेल्थ चे धिरज रोकडे,डँक्यु च्या दीपा शिपुरकर,प्रकाश पाटील, बंटी सांवत,तुषार भिवटे,बाळासो साळवी,डीटीसी चे एम.एस.पाटील आदी मान्यवर ऊपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन पक्षीमित्र धनंजय नामजोशी यांनी केले.

Leave a Reply