सर्व्हे पुर्ण होणेसाठी फेरीवाला संघटनांनी सहकार्य करावे -महापौर

 

कोल्हापूर : सर्व्हे पुर्ण होणेसाठी फेरीवाले संघटनांनी व फेरीवाल्यांनी सर्व्हेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच प्रशासनाने फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व्हे लवकरात लवकर पुर्ण करावा असे आवाहन महापौर सौ.सरीता मोरे यांनी केले. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणेच्या कारवाईबाबत आज महापालिका पदाधिकारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक छ.ताराराणी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ.सरीता मोरे होत्या.
    प्रारंभी इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले यांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीसाठी करणेत आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यामध्ये शासनाने सर्व्हेसाठी स्वतंत्र ऍ़प दिलेला आहे त्याद्वारे शहरातील फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण केले जाणार असलेचे सांगितले. यासाठी फेरीवाल्याकडे आधार कार्ड असणे अणिवार्य आहे. सर्व्हेवेळी त्यांचा फोटो घेऊन त्याच्या व्यवसायाचे स्वरुप, त्याच्या व्यवसायाचे ठिकाण, त्याचा कालावधी व इतर माहिती घेतली जाणार आहे. यासाठी मोबाईल क्रमांकाशी आधार कार्ड संलग्न असावा. तसेच अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), रेशनकार्ड, अपंगत्वाचा दाखला (असल्यास), जातीचे प्रमाणपत्र (असल्यास), एकल/विधवा प्रमाणपत्र (असल्यास) इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक नसल्यास सर्व्हेकरताना अडचणी येऊ शकतात. यासाठी फेरीवाल्यांनी याची काळजी घेणे आवश्यक आहे. फेरीवाल्यांची नोंदणी पुर्ण झालेनंतर सात दिवसात त्यांनी विभागीय कार्यालयात कागदपत्रे देणे गरजेचे आहे. जेणेकरुन ते अपलोड करता येतील असे सांगितले.
    माजी महापौर आर के पोवार म्हणाले महापालिका व फेरीवाल्या संघटना यांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडविला पाहिजेल. काही ठिकाणे वादाचे आहेत त्यातून मार्ग काढूया. फेरीवाला पुर्नवसनासाठी झोन निश्चित होणे आवश्यक आहे. फेरीवाल्यांमध्ये काही अशिक्षीत वर्ग आहे अशा लोकांना या मोबाईल ऍ़पचा वापर करणे अडचणीचे आहे. प्रशासनाला आमची सर्व मदत मिळेल फक्त योग्य पध्दतीने नियोजन व्हावे. फेरीवाले हे रस्त्यावर व हातगाडयावर आपला व्यवसाय करतात. काही ठराविकच केबीनधारक आहेत. त्यांना कायमचे संरक्षण व्हावे. शहरामध्ये ज्या केबीन्स वाढलेल्या आहेत. त्या सुरु करणारे व बंद करणारे ठराविक लोक आहेत त्याचा शोध लावा. आमचे फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करणारे आहेत.
    आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले शहरातील जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी नोदंणी करुन घ्यावी. सर्व्हे करताना स्थानिक नेते व फेरीवाल्यांना कल्पना देवू. आपल्या विविध संघटने मार्फत आपण त्यासाठी आवाहन करावे की सर्व्हेच्या वेळी आधारशी संलग्न असलेला मोबाईल जवळ ठेवावा. जेणेकरुन सर्व्हे करताना येणार ओटीपी मोबाईलवर येईल त्यानंतर संबंधीत विभागीय कार्यालयामध्ये आपली कागदपत्रे सादर करावीत. सर्व्हेचे काम सहा महिने ते एक वर्षात पुर्ण करु. 
    यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू, दिलीप पोवार, महमदशरीफ शेख, सुरेश जरग, राजू जाधव, अशोकराव भंडारे, रघुनाथ कांबळे यांनी आपल्या सुचना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!